मुंबई : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाची रिलीज डेट विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्यानंतर आणि आता अखेर त्याचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यानंतर चित्रपटाची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. टीझरमधील कार्तिकचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. (Teaser of 'Bhool Bhulaiyaa 2' is out, Kartik Aaryan is seen in full swag in the film)
अधिक वाचा : London Files: काश्मीर फाईल्स नंतर येतेय 'लंडन फाईल्स', जाणून घ्या कधी आणि कुठे होणार रिलीज
टीझरची सुरुवात 'आमी चे तुम्हारा' या लोकप्रिय गाण्याने होते. यानंतर झपाटलेल्या हवेलीची झलक दिसते. इथल्या एका दाराला मोठं कुलूप आहे, जे पाहिल्यावर आपोआप उघडतं. यानंतर ओरडणाऱ्या आत्म्याची झलक दिसते. टीझर पाहिल्यानंतरच या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
53 सेकंदांच्या या टीझरमध्ये कार्तिक आर्यनने डोक्यावर स्कार्फ बांधून काळा कुर्ता परिधान करून एंट्री घेतली आहे. त्याला पाहताच 'भूल भुलैया'चा अक्षय कुमार आठवतो. 'भूल भुलैया 2' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक मानला जातो. 2007 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 'भूल भुलैया' या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. हे पाहता कार्तिक आर्यनला घेऊन 'भूल भुलैया 2' बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. चित्रपटाच्या नव्या स्टारकास्टसोबत बरेच दिवस काम सुरू होते.
आता 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक व्यतिरिक्त कियारा अडवाणी, संजय मिश्रा, तब्बू आणि राजपाल यादव हे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट 20 मे 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.