Tesla Car Video: ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या नाटू-नाटू गाण्यावर टेस्ला कारचा अप्रतिम डान्स, पहा VIDEO

झगमगाट
Updated Mar 21, 2023 | 13:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tesla Car Video on Natu Natu: ऑस्कर जिंकल्यानंतर नाटू नाटू गाणं आणखी चर्चेत आलं आहे. परदेशातही या यशाचा जल्लोष साजरा होत आहे. हा जल्लोष साजरा करण्याऱ्यांमध्ये जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक एलॉन मस्क यांनीही उडी मारली आहे.

Tesla New Jersey Car Video
टेस्ला कारने नातू-नाटू गाण्यावर केला अप्रतिम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गाड्यांच्या हेडलाईट्स नाटू नाटू वर ब्लिंक होतात
  • टेस्ला कारमध्ये लाईट शो फिचर
  • अमेरिकेतील न्यू जर्सीमधून एक व्हिडिओ समोर आला

Tesla New Jersey Car Video: एस.एस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्यावर केवळ भारतीय प्रेक्षकच थिरकले नाही तर परदेशी प्रेक्षकांवरही या गाण्याची जादू पहायला मिळाली. या गाण्याला नुकताच 'बेस्ट ओरिजिनल सॉन्ग' कॅटेगरीत ऑस्कर देखील मिळाला आहे. ऑस्कर पुरस्कार पटकावल्यानंतर मात्र हे गाणं आणखी चर्चेत आलं आहे. परदेशातही या यशाचा जल्लोष साजरा होत आहे. हा जल्लोष साजरा करण्याऱ्यांमध्ये जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक एलॉन मस्क यांनीही उडी मारली आहे.

नुकताच, अमेरिकेतील न्यू जर्सीमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, यात टेस्ला कारमधील लाईट शो फिचरचा वापर करुन चक्क गाड्यांनीच या गाण्यावर ताल धरला होता. या लाईट शोच्या माध्यमातून मस्क यांनी या गाण्याप्रतीचा त्यांचा आदरभाव व्यक्त केला. टेस्ला गाड्यांना नाटू-नाटू गाण्यावर नाचत असल्याचं पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. काही प्रेक्षकांनी टेस्ला गाड्यांचा हा डान्स त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा: Oscars 2023: RRR रचणार इतिहास: जाणून घ्या भारतात कधी आणि केव्हा बघता येईल ऑस्कर पुरस्कार सोहळा
 
ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करुन मानले आभार 

दरम्यान, RRR च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एका मिनिटाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर,  @Teslalightshows New Jersey येथे #Oscar Winning song #NaatuNaatu च्या बीट्सवर लाईट सिंक केल्याबद्दल धन्यवाद. सर्वांच्या प्रेमासाठी आभार! असं कॅप्शन दिलं आहे. 

अप्रतिम लाईट शो 

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, पार्किंगमध्ये पार्क केलेल्या टेस्ला कारच्या डझनभर गाड्या गाण्याच्या बीट्ससह त्यांच्या हेडलाईट्स ब्लिंक करताना दिसत आहेत. लाल आणि पांढर्‍या रंगाच्या लाईट्स जणू गाण्यावर ताल धरत असल्याचं जाणवल्याशिवाय राहतं नाही. डोळ्यांना बघण्यासाठी हे दृष्य नितांत सुंदर दिसत आहे.

अधिक वाचा:  Oscar 2023 Winners Full List : 'नाटू नाटू' सह कोणाच्या हाती आला पुरस्कार ; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी

हे कसं शक्य झालं? 

एकावेळी इतक्या गाड्यांच्या हेडलाईट्स कशा ब्लिंक होतात? व्हिडिओ पाहून हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तर टेस्लाच्या कार 'टेस्ला टॉयबॉक्स' नावाच्या फीचरद्वारे तुम्ही लाईट शो सादर करू शकता. टेस्लाच्या कारमध्ये लाईट शो मोडसह अनेक फिचर्स दिले आहेत. लाईट शो फिचर कारच्या हेडलाईट्स, टेललाईट्स, टर्न सिग्नल्स आणि अंतर्गत लाईट्स फ्लॅश करण्यासाठी आणि गाण्यासह रंग बदलण्यासाठी प्रोग्राम केले आहेत. सोबतच टेस्ला कारच्या साऊंड सिस्टिमला कारच्या स्पीकर्समधून गाणी वाजविण्यासाठी प्रोग्राम केलं जाऊ शकतं. हे फिचर फक्त टेस्ला मॉडेल -एस, मॉडेल एक्स आणि मॉडेल 3 मध्ये उपलब्ध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी