Elon Musk New Girlfriend | पन्नाशीचे मस्क मारतायत नव्या गर्लफ्रेंडला मस्का, विशीतील नताशासोबत An Evening in Paris

टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे एलॉन मस्क यांचं सध्याचं वय आहे 50 वर्षांचं. त्यांची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत. सध्या ते आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत डेटिंग करत असून फ्रान्समधील समुद्रकिनाऱ्यांवर एकत्र फिरताना दिसत आहेत.

Elon Musk New Girlfriend
पन्नाशीतील मस्क यांची विशीतील नवी गर्लफ्रेंड  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • एलॉन मस्क यांची आतापर्यंतची सर्वात तरुण गर्लफ्रेंड
  • तीन लग्न झालेले मस्क जोडतायत नवा धागा
  • फ्रान्समध्ये नव्या गर्लफ्रेंडसोबत घालवतायत वेळ

Elon Musk New Girlfriend | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे एलॉन मस्क (Elon Musk) हे नुकतेच त्यांच्या नव्या गर्लफ्रेंडसोबत (New girlfriend) रोमान्स (Romance) करताना दिसले. 50 वर्षांच्या मस्क यांची नवी गर्लफ्रेंड आहे अवघ्या 23 वर्षांची. नताशा (Natasha) ही अभिनेत्री (Actress) आहे आणि मूळची ऑस्ट्रेलियाची (Australia) रहिवासी आहे. 

आतापर्यंतची सर्वात तरुण गर्लफ्रेंड

एलॉन मस्क यांच्या आजवरच्या गर्लफ्रेंडच्या यादीत नताशा ही सर्वात कमी वयाची तरुणी आहे. पन्नाशीतले एलॉन मस्क आपल्या विशीतल्या गर्लफ्रेंडसोबत फ्रान्समधल्या एका अलिशान हॉटेलमध्ये लंच घेत असल्याचं दिसून आलं. पॅरिसमधलं शेवल ब्लॉन्क नावाच्या अलिशान हॉटेलमध्ये हे जोडपं भरपेट जेवलं आणि त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना दिसलं. 

अभिनेत्री नताशा बॅसेट

नताशाच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून

नताशानं तिच्या करिअरची सुरुवात वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी केली. ऑस्ट्रेलियातील एका थिएटरमध्ये तिने छंद म्हणून अभिनय करायला  सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन थिएटर फॉर यंग पीपल या संस्थेमार्फत तिने ‘रोमियो अँड ज्युलिएट’ या नाटकात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर अभिनयातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती ऑस्ट्रेलियातून न्यूयॉर्कला रवाना झाली. 2014 साली तिने एक शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली. अनेक नाटकांमध्ये तिनं यापूर्वी काम केलं आहे. वेगवेगळ्या टीव्ही मालिकांमध्येही तिने भूमिका केल्या आहेत. 

2017 साली ब्रिटनी स्पिअर्सच्या बायोपिकमध्ये नताशानं प्रमुख भूमिका निभावली होती. तर तिचा एल्विस नावाचा नवा चित्रपट काही दिवसांतच प्रदर्शित होणार आहे. 

मस्क यांच्या गर्लफ्रेंडची मोठी यादी

एलॉन मस्क यांची नताशा ही सर्वात लेटेस्ट आणि कमी वयाची गर्लफ्रेंड आहे. एलॉन मस्क यांची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत. या तीन लग्नांपैकी एकाच तरुणीशी त्यांनी दोन वेळा लग्न केलं होतं. मस्क यांना एकूण 7 मुलं आहेत. यापैकी 6 मुलगे आणि 1 मुलगी आहे. कॅनडातील प्रसिद्ध लेखिका जस्टिन विल्सन या मस्क यांच्या पहिल्या पत्नी. त्यांच्यापासून मस्क यांना पाच अपत्ये आहेत. त्यातील दोघे जुळे आहेत. 

2000 साली झालं पहिलं लग्न

विल्सन आणि मस्क हा शुभविवाह 2000 साली संपन्न झाला होता. आठ वर्षाच्या संसारानंतर म्हणजेच 2008 साली त्यांचा घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मस्क यांचं मूळच्या दक्षिण अफ्रिकन असलेल्या तलुलाह रिले यांच्याशी सूत जुळलं. ही नवी जोडी 5 वर्ष टिकली आणि नंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

एलॉन मस्क पहिल्या पत्नीसोबत

कॅनडाची पॉप सिंगर ग्रीम्स आणि एलॉन मस्क हे पहिल्यांदा एकत्र दिसले होते ते चीन दौऱ्यात. या दोघांचं नातं पुढची तीन वर्षं टिकलं. आता नताशासोबत नव्या नात्याला मस्क यांनी सुरुवात केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी