...तो कारर्किदीतला best scene, 'रानबाजार'वर प्राजक्ताची बोल्ड पोस्ट

Ranbazar : 'रानबाजार' या वेब सीरिजचा पहिला भाग नुकताच रिलिज झाला आहे. सोशल मीडियावर या वेबसीरिजची खूपच चर्चा आहे. मराठी मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारा 'रानबाजार' असंही या वेबसीरिजला म्हटलं जातं आहे. या सीरिजचा विषय खूपच बोल्ड आहे. मराठी वेब विश्वात पहिल्यांदाच इतका बोल्डनेस दाखण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय.

... the best scene of his career, bold post by Prajakta Mali on 'Ranbazar'
...तो कारर्किदीतला best scene, 'रानबाजार'वर प्राजक्ताची बोल्ड पोस्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितचे बोल्ड सीन्स असलेल्या रानबाजार' वेबसीरिजचा पहिला भाग लाँच  
  • मागच्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.
  • पण कालचा भाग प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून तिचं कौतुक होत आहे.

मुंबई : अभिजीत पानसे  दिग्दर्शित 'रानबाजार' या वेब सीरिजचा पहिला भाग नुकताच लाँच झाला आहे. सोशल मीडियावर या वेबसीरिजची खूपच चर्चा आहे. दरम्यान, आज अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मिडियावर या वेब सिरीजमधील तिच्या आवडत्या सीनबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या बोल्ड पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सिरीजमधील तिच्या कामाचे कौतुक केले जात आहे. (... the best scene of his career, bold post by Prajakta Mali on 'Ranbazar')

अधिक वाचा : 

Ashok Saraf Birthday : अशोक मामांची भन्नाट लव्हस्टोरी, १८ वर्षांनी लहान निवेदितांसोबत केलं लग्न

आज प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आज एक पोस्ट शेअर केली. आणि जो scene माझ्या कारर्किदीतला one of the best scene आहे (अस फक्त मला नाही, अनेक जणांना वाटतय..) तो scene असलेला episode काल प्रदर्शित झाला… (one take one shot) #raanbaazaarजरूर बघा आणि प्रतिक्रिया द्या. @planetmarathiott असं म्हणत तिनं तिच्या आवडत्या सीनविषयी तर सांगितले आहेच. शिवाय रानबाजार चे एकूण 8 भाग आलेत, फक्त 2 राहिल्याची कल्पना देखील प्रेक्षकांना दिली आहे.

अधिक वाचा : 

Samrat Prithviraj Collection: बॉक्स ऑफिसवर 'सम्राट पृथ्वीराज'ला संमिश्र प्रतिसाद, पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा रानबाजार या वेबसीरीजा टीझर रिलीज झाला होता. त्यात प्राजक्ता माळीचा बोल्ड लूक पाहून प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. सोज्वळ आणि सात्विक अशी इमेज असलेली प्राजक्ता पहिल्यांदाच इतक्या हटके लूकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. रेगे आणि ठाकरे या चित्रपटांच्या यशानंतर दिग्दर्शन अभिजीत पानसे यांची रानबाजार ही वेबसीरीज रिलीज होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. ही उत्सुकता २० मेला संपली आहे. ८ भागांच्या वेबसिरीजपैकी ६ भाग रिलीज झालेआहे. वेबसिरीजमध्ये प्राजक्ता आणि तेजस्वीनीच्या बोल्ड लूकची झलक प्रेक्षकांसमोर आली होती. यामुळे प्राजक्ता माळीला ट्रोलही करण्यात आले होते. तर दुसरीकडे तेजस्विनी पंडीतही बोल्ड भूमिकेत दिसत आहे. तेजस्विनीचा हा लूक पाहून चाहत्यांनी तिलाही ट्रोल केले होते. 

अधिक वाचा : 

Esha Gupta in Aashram 3: 'आश्रम 3' मधील बाबा निरालासोबतच्या इंटिमेट सीनवर ईशा गुप्तांचं मोठं वक्तव्य.


या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर डॉ. मोहन आगाशे, मोहन जोशी, सचिन खेडेकर, अनंत जोग, जयंत सावरकर, मकरंद अनासपूरे, वैभव मांगले, माधुरी पवार, उर्मिला कानेटकर, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, नम्रता गायकवाड, अशी तगडीआणि मराठीतील आघाडीची स्टारकास्ट या वेबसीरिजमध्ये आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी