किरण मानेंना काढण्याचा निर्णय राजकीय भूमिकेचा नसून .... , "मुलगी झाली हो" च्या निर्मात्यांनी सोडलं मौन

kiran mane serial left : मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेता किरण माने यांना मालिकेतून अचानक काढल्याने राज्यात चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, मालिकेचे निर्माता, दिग्दर्शक आणि सहकलाकारांची प्रतिक्रिया आली असून माने यांना मालिकेतून काढण्याचा निर्णय राजकीय भूमिका नसून व्यावसायिक असल्याचे म्हटले आहे.

The decision to remove Kiran Mane was not a political one, but the producers of 'Professional', 'Mulgi Jhali Ho' remained silent.
किरण मानेंना काढण्याचा निर्णय राजकीय भूमिकेचा नसून 'व्यावसायिक' , "मुलगी झाली हो" च्या निर्मात्यांनी सोडलं मौन   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • किरण माने यांनी राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून काढले
  • सोशल नेटवर्किंगवर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चांगला ट्रेंड झाला.
  • निर्मात्यांनी माने यांच्या आरोपाचे खंडन केले.

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारणारा अभिनेते किरण माने (kiran mane) यांना अचानक काढून टाकण्यात आल्याने मनोरंजन तसेच राजकीय वातावरण तापले होते. दरम्यान, या मालिकेच्या निर्मात्यांनी मौन सोडले असून किरण माने यांना मालिकेतून काढण्यामागे राजकीय भूमिका नसून व्यावसायिक कारण आहे, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, याच अनुषंगाने माने यांनी आज मुंबई येथे राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार(sharad pawar) यांची भेट घेतली. या भेटीतील तपशील समजू शकला नाही  (The decision to remove Kiran Mane was not a political one, but the producers of 'Professional', 'Mulgi Jhali Ho' remained silent.)

अभिनेते किरण माने गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करतात. ते त्यांच्या अभिनयाच्या क्षेत्राबरोबर सोशल मिडियावर त्यांच्या लिखाणाच्या शैलीने चर्चेत असतात. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात.

सोशल मिडियावर हॅशटॅग ट्रेंड

मुलगी झाली हो या मालिकेत माने यांनी साकारलेली विलास पाटील ही भूमिका घराघरांमध्ये पोहचली आहे. दरम्यान, माने यांनी राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोशल नेटवर्किंगवर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चांगला ट्रेंड झाला. त्यामुळे मनोरंजन आणि राजकीय वातावरण तापले होते.  

निर्मात्यांकडून आरोपाचे खंडण

अशा परिस्थितीमध्ये निर्मात्या सुझान घई यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माने यांच्या आरोपाचे खंडन करत म्हटले आहे की, “माने यांच्या राजकीय भूमिकेचा आणि त्यांना काढून टाकण्याचा काही संबंध नाही. माने यांना काढण्याचा निर्णय हा व्यावसायिक होता. काही व्यावसायिक कारणं होती त्याबाबत माने यांना माहिती आहे. त्यांना त्याबाबत अनेकदा कल्पना देखील दिली होती. त्यांना अनेकदा सूचना देऊनही त्या कारणांचे समाधान न झाल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.”

मानेंच्या विरोधात सहकलाकार एकवटले

अभिनेते किरण माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊन त्यांच्याकडे आपली बाजू मांडणार असल्याचे बोलले जात आहे. सोशल मिडियावर अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जातेय. किरण माने यांच्या विरोधात आता मालिकेतील कलाकार एकवटले आहेत. किरण माने यांच्या गैरवर्तणुकीमुळेच त्यांना मालिकेतून काढण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी