या आठवड्यात बाॅलिवूड फिल्मला टक्कर देण्यास येणार 'शेर शिवराज'

या शुक्रवारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी विविध भाषांमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, पण ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ नंतर आता लवकरच त्यांचा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘शेर शिवराज’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. चला तर मग जाणून घेऊया या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दल-

The historical film 'Sher Shivraj' will be released this week
या आठवड्यात बाॅलिवूड फिल्मला टक्कर देण्यास येणार 'शेर शिवराज'   |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • दिग्पाल लांजेकर यांचे ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
  • ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट सुपरहिट ठरले
  • आता शेर शिवराज हा चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : नवीन आठवडा सुरू होताच लोक शुक्रवारची आतुरतेने वाट पाहत असतात. वास्तविक शुक्रवारी देशभरात विविध भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होतात. दर आठवड्याला प्रदर्शित होणारे हे चित्रपट तुमच्या वीकेंडचे मनोरंजन करण्याचा एक चांगला मार्ग आहेत. अशा परिस्थितीत या शुक्रवारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी विविध भाषांमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत,. चला तर मग जाणून घेऊया या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दल (The historical film 'Sher Shivraj' will be released this week)

अधिक वाचा : Film Jersey Story, Star Cast, Release Date: प्रेम, रोमान्स आणि उत्कटतेने भरलेला आहे जर्सी सिनेमा, जाणून घ्या कथा आणि स्टार कास्ट

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ नंतर आता लवकरच त्यांचा आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘शेर शिवराज’ असे या मराठी ऐतिहासिक चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 'येळकोट देवाचा' हे गाणे देखील प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखानाचा खात्मा, त्याचा इतिहास या चित्रपटातून पाहायला मिळेल.

अधिक वाचा : KGF Chapter 2 Record: आमिर खानच्या चित्रपटाला मागे टाकण्यात यशला अपयश, 'KGF 2' ने मोडला 'द काश्मीर फाइल्स'चा रेकॉर्ड

'शेर शिवराज'ची निर्मिती मुंबई मूव्ही स्टुडिओचे नितीन केनी, राजवर्षा प्रॉडक्शनचे प्रद्योत पेंढारकर आणि अनिल नारायणराव वरखडे आणि मुलक्षारचे दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे. फर्जंद, फत्तेशिकास्त आणि पावनखिंडच्या यशानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकमधील 'शेर शिवराज'मध्ये प्रेक्षकांसमोर येणारी ही चौथी चित्रपुष्प आहे. 'शेर शिवराज' हे शिवरायांच्या अद्भुत गुणांचे आणि अतुलनीय युद्धकौशल्याची अभिव्यक्ती आहे. चित्रपटात हेच घडणार आहे.

अधिक वाचा : akshay kumar tobacco ad : ...म्हणून अक्षय कुमारने मागितली माफी

शेर शिवराज हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच २२ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. यात चिन्मय मांडलेकर, मुकेश ऋषी, मृणाल कुलकर्णी आणि अजय पूरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अफझलखानची हत्या आणि मराठा योद्धा राजाच्या विविध पैलूंवर हा चित्रपट केंद्रित आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी