मुंबई : थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय…’ हे गाणं आठवतयं ? अभिनेता मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव स्टारर २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दे धक्का’ चित्रपटाने चित्रपटगृहात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होत असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होय. (The new heroine's entry in 'De Dhakka 2')
अधिक वाचा :
सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे दिग्दर्शित "दे धक्का" जवळजवळ 14 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि खूप हिट झाला. या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांमध्ये एक विशेष स्थान मिळवले होते आणि आता सिक्वेल महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली स्वाती खोपकर आणि सायक्लिंक एंटरटेनमेंटच्या यतीन जाधव यांनी याची निर्मिती केली आहे. निनाद नंदकुमार बतीन आणि तबरेज एम. पटेल यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.
अधिक वाचा :
Shaktimaan Back : 'शक्तिमान'आता सिनेमातून भेटायला येणार, सुमारे 300 कोटी सिनेमाचं बजेट
दे धक्का 2 मध्ये त्याच्या प्रीक्वलसारखीच स्टारकास्ट आहे: शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी आणि सिक्वेलचे कलाकार संजय खापरे, प्रवीण विठ्ठल तरडे, विद्याधर जोशी, भारती आचरे आणि बरेच जण आहे. पण या चित्रपटात सर्वात उत्सुकता आहे ती महेश मांजरेकर यांच्या लेकीची एण्ट्रीची. अभिनेते महेश मांजरेकर यांची तिसरी लेक गौरी इंगवले तिच्या कामामुळे चर्चेत असते. गौरी यापूर्वी कुटुंब, ‘पांघरुण’ या सारख्या चित्रपटानंतर ‘दे धक्का २’ चित्रपटातही गौरी काम करताना दिसणार आहे.