Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

झगमगाट
Updated Aug 21, 2019 | 23:08 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Hollywood News: हॉलिवूडचा द रॉक अर्थात ड्वेन जॉन्सन गर्ल्डफ्रेंड लॉरेन हशियन हिनं लग्नात जो गाऊन घातलाय त्याची किंमत तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. तिच्या गाऊनच्या किमतीत भारतात एखादी कार खरेदी करता येऊ शकते.

 Dwayne Johnson second marriage
रॉकच्या लग्नातील वेडिंग गाऊनची किंमत माहितीय?  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • द रॉक ड्वेन जॉन्सननं केलं दुसरं लग्न; बारा वर्षे डेटिंग केल्यानंतर घेतला लग्नाचा निर्णय
  • २००७ मध्ये ड्वेन जॉन्सन पहिल्या पत्नीपासून झाला होता विभक्त
  • लग्नाचे ठिकाण ठेवण्यात आले होते गुपित; सोशल मीडियावर शेअर केले फोटो

Hollywood News: सेलिब्रिटिंच्या लग्नाचे किस्से काही औरच असतात. मग ते बॉलिवूड सेलिब्रिटी असोत किंवा हॉलिवूड. काहींना आपल्या खासगी आयुष्यात प्रायव्हसी हवी असते तर, काही जण खासगी आयुष्य सगळ्यांशी शेअर करतात. नुकताच हॉलिवूड स्टार आणि फायटर ड्वेन जॉन्सन अर्थात द रॉकने दुसरं लग्न केलं. मुळात त्याच्या लग्नाची माहिती सोशल मीडियावरूनच मिळाली. पण, हे लग्न आता वेगळ्याच कारणानं चर्चेत आलंय. या लग्नात रॉकची गर्ल्डफ्रेंड लॉरेन हशियन हिनं जो गाऊन घातलाय त्याची किंमत तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. तिच्या गाऊनच्या किमतीत भारतात कार खरेदी करता येऊ शकते तर, काहींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च भागू शकतो. रॉकच्या बिच वेडिंगचा फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यातील लॉरेनचा वेडिंग गाऊन विशेष चर्चेत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

We do. August 18th, 2019. Hawaii. Pōmaikaʻi (blessed) @laurenhashianofficial❤️ @hhgarcia41?

A post shared by therock (@therock) on

गाऊनच ठरला लक्षवेधी

रॉकने आपला दुसरा विवाह अगदी खासगी आणि मोजक्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत केला. एका बिचवर झालेल्या या सोहळ्यातील मोजकेच फोटो सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत. १८ ऑगस्टला हा विवाह सोहळा संपन्न झालाय. त्याच्या फोटोंमध्ये नव दाम्पत्य खूपच स्टायलिश दिसत आहे. रॉक व्हाईट शर्ट आणि ट्राउजर्समध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे तर, लॉरेनचा वेडिंग गाऊन लक्षवेधी ठरत आहे. त्या गाऊनची किंमत हैराण करायला लावणारी आहे. लॉरेनने मीरा झ्विल्लिंगरचा व्हाईट स्लिवलेस गाऊन कॅरी केला आहे. त्यावर फुलांची एम्ब्रॉयडरी करण्यात आलीय. तो एक डीप नेक गाऊन होता. त्याच्या पाठीवरही सेम डिटेलिंग करण्यात आलीय. कमरेपासून तो गाऊन फिडेट आहे. वेडिंगसाठीच डिझाइन केलेल्या या गाऊनची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाऊनची किंमत १२ हजार ५० डॉलर होती. म्हणजेच भारतीय रुपयांत याची किंमत ८ लाख ६२ हजार ४०० रुपये होत आहे.

रॉकचं दुसरं लग्न

रॉक आणि लॉरेन २००७पासून एकमेकांना डेट करत होते. त्यांना जॅस्मिन (३ वर्षे) आणि टायना (१६ महिने) अशा दोन मुलीही आहेत. दोघांनी लग्न करण्याची नुकतीच घोषणा केली होती. रॉकचं हे दुसरं लग्न असून, १९९७मध्ये डॅनी ग्रासियासोबत त्याचं लग्न झालं होतं. डॅनी आणि रॉक कॉलेज जीवनापासून मित्र होते. पण, त्यांनी दहा वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रॉकच्या आयुष्यात लॉरेन आली. दोन मुलींना जन्म दिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे डॅनी आणि रॉक यांनाही एक मुलगी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...