International Women's Day: महिला दिनी जरूर पाहा बॉलिवूडचे हे ६ सिनेमे,जिंकली चाहत्यांची मने

झगमगाट
Updated Mar 08, 2021 | 12:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

आज आंतरराष्ट्री महिला दिनीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला ६ बॉलिवूड सिनेमांबाबत सांगत आहोत जे तुम्ही जरूर पाहिले पाहिजे. 

cinema
महिला दिनी जरूर पाहा बॉलिवूडचे हे ६ सिनेमे 

थोडं पण कामाचं

  • आज ८ मार्च जगभरात महिला दिवस म्हणून साजरा केला जातो
  • या दिवशी हे ६ बॉलिवूड सिनेमे जरूर पाहिले पाहिजेत. 
  • जाणून घ्या कोणते आहेत हे सिनेमे

मुंबई: दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांना समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी समाजात महिलांचे योगदान पाहता त्यांचा सन्मान केला जातो. समाजात महिलांचे योगदान आणि त्यांचे महत्त्व बॉलिवूडनेही समजले आहे. त्यामुळे महिला केंद्रित सिनेमे बनवण्यात आले आहेत. या सिनेमांना चाहत्यांची चांगली पसंती मिळाली. जाणून घ्या महिलांकेंद्रित सिनेमे ज्यांनी चाहत्यांची मने जिंकली. 

इंग्लिश विंग्लिश

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना फर्स्ट फिमेल सुपरस्टार म्हटले जात होते. त्यांच्या सिनेमांना चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. २०१२मध्ये त्यांचा सिनेमा इंग्लिशविंग्लिश रिलीज झाला. यात श्रीदेवीने एका हाऊसवाईफची भूमिका साकारली होती. अशी महिला जिला नेहमी कमी लेखल जाते. हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता. 

क्वीन 

अभिनेत्री कंगनाराणावत महिला प्रधान सिनेमांसाठी ओळखली जाते. २०१४मध्ये रिलीज झालेल्या या सिनमात कंगनाने रानी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. जिचे लग्न तुटल्यानंतर ती एकटी हनीमूनला निघून जाते. त्यानंतर तिचे जीवन बदलून जाते. या सिनेमात कंगनाला खूप पसंती मिळाली होती. 

निल बटे सन्नाटा

२०१५मध्ये रिलीज झालेली स्वरा भास्करचा सिनेमा निल बटे सन्नाटा महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देतो. या सिनेमात दाखवण्यात आले आहे की कठीण परिस्थिती असतानाही प्रत्येक व्यक्तीला आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा हक्क आहे. 

पिंक 

२०१६मध्ये तापसी पन्नूचा पिंक सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात सांगवण्यात आले की महिलांची संमती गरजेची आहे. सिनेमात तापसीने एका पिडीतेची भूमिका साकारली हती. या सिनेमात अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

तुम्हारी सुलू

२०१७मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात विद्या बालनने महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा सिनेमा एका महिलेच्या विश्वाभोवती फिरतो. जिची अनेक स्वप्ने अपूर्ण असतात. मात्र नंतर ती आत्मनिर्भर बनते. 

छपाक

२०२०मध्ये रिलीज झालेला दीपिका पदुकोणचा सिनेमा छपाक अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात लक्ष्मीचे संपूर्ण जीवन दाखवण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी