Vicky Kaushal Katrina Kaif Wedding: विक्की कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नात नाही येणार हे ७ सुपरस्टार अभिनेते

झगमगाट
Updated Nov 17, 2021 | 19:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांचे लग्न येणाऱ्या काळात बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेला इव्हेंट आहे. मात्र या लग्नात काही प्रसिद्ध कलाकार असणार नाही आहेत. 

vicky kaushal and katrina kaif
विक्की,कतरिनाच्या लग्नात नाही येणार हे ७ सुपरस्टार 
थोडं पण कामाचं
  • कतरिना कैफ आणि विक्की कौशल धुमधामीत करणार लग्न
  • सुपरस्टार्सच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची लांब यादी
  • सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार नाही येणार लग्नाला 

मुंबई: बॉलिवूडमणध्ये(bollywood) सध्या लग्नसराईचा(marriage) हंगाम सुरू आहे. अभिनेता राजकुमार रावने(rajkumar rao) अखेर आपली लाँगटर्म गर्लफ्रेंड पत्रलेखाशी लग्न केले आहे. दरम्यान आणखी दोन सुपरस्टार्सचे लग्न जवळ आले आहे. हे आहेत विक्की कौशल(vicky kaushal) आणि कतरिना कैफ(katrina kaif). दोघेही ७ ते १२ डिसेंबरदम्यान बीच बरवारा लक्झरी रिसॉर्टच्या सिक्स सेंस फोर्टमध्ये लग्न करणार आहे. येथे एका रूमची किंमत एका रात्रीसाठी तब्बल ७५ हजाराहून अधिक आहे. लग्न इतके भव्यदिव्य असणार आहे त्यातूनही सुपरस्टार पाहुण्यांची एक लांब लिस्ट आहे. यातच बॉलिवूडचे प्रमुख सुपरस्टार आहेत जे लग्नाला येणार नाही आहेत. This 7 super star cant attend vicky kaushal and katrina kaif wedding

सलमान खान

सलमान खान बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. रिपोर्टसनुार विक्की कौशलने कतरिनाला त्याच्यासमोरच प्रपोज केले होते. असेही म्हटले जात होते या लग्नाला आमंत्रित करण्यात आलेला सलमान पहिला व्यक्ती होता. दरम्यान, असे वाटत आहे की गेल्या काही काळात सलमान आणि कतरिना यांच्यातील संबंधामुळे तो लग्नात सामील होणार नाही. 

अक्षय कुमार

अक्षय आणि कतरिना नुकतेच रोहित शेट्टीचा ब्लॉकबस्टर सिनेमा सूर्यवंशीमध्ये दिसले होते. याआधी त्यांनी वेलकम, सिंह इज किंगमध्येही एकत्र काम केले होते. दरम्यान इतर अन्य प्रोजेक्टमध्ये अक्षय कुमार व्यस्त असल्याने तो कदाचित कतरिनचाच्या लग्नात उपस्थित राहू शकणार नाही. 


रणबीर कपूर आणि आलिया भट्ट

दोघेही स्टार पुढील वर्षी एकमेकांसोबत लग्न करण्यास तयार आहत. दरम्यान, दोघेही विक्की आणि कतरिना यांचे लग्न मिस करू शकतात. दरम्यान, याचे कोणतेही स्पष्ट कारण नाही मात्र अटकळी अशा आहेत की आलियाआधी रणबीर कतरिनाला डेट करत होता  हे यामागचे कारण असू शकते. 

अजय देवगण

अजय देवगण असा एक स्टार आहे जो साधारणपणे बॉलिवूडच्या सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहतो. सिनेमांच्या प्रमोशनव्यतिरिक्त तो इतर कार्यक्रमांमध्ये फार कमी वेळा दिसतो. 

शाहरूख खान

शाहरुख खानने अनेक सिनेमे कतरिनासोबत एकत्र केले आहेत. दोघांचे बॉन्डिंगही चांगले आहे. दरम्यान, किंग खान सध्या मुलगा आर्यनच्या इतक्यासारख्या समस्यांमध्ये गुंतला आहे त्यामुळे त्याचे येणे कठीण वाटते. 

आमिर खान

आमिर खान आणि कतरिना यांनी धूम ३मध्ये एकत्र काम केले होते. स्क्रीनवर त्याची केमिस्ट्री जबरदस्त होती. दरम्यान, अभिनेता सध्या लाल सिंह चढ्ढा या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याकारणाने कतरिना आणि विक्की यांच्या लग्नाला हजर राहू शकत नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी