हो ! परपुरुषासोबत रात्र काढल्यामुळं ही अवस्था, 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीने दिली कबुली

Kubra Sait Unwanted Pregnancy:अभिनेत्री कुब्रा सैतने अलीकडेच खुलासा केला आहे की वन नाईट स्टँड दरम्यान ड्रिंक घेतल्यानंतर मित्रासोबत इंटीमेट झाली. अशा परिस्थितीत नको असलेल्या गर्भधारणेमुळे तिला गर्भपात करावा लागला.

This actress had to spend a night with a person, she had to undergo abortion; had become such a condition
हो ! परपुरुषासोबत रात्र काढल्यामुळं ही अवस्था, 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीने दिली कबुली ।   |  फोटो सौजन्य: BCCL

Kubra Sait One Night Stand: 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमध्ये आपल्या बोल्ड व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध झालेली अभिनेत्री कुब्रा सैत तिच्या रिअल लाईफमध्येही तितकीच बोल्ड आहे.  अभिनेत्रीने नुकतेच तिचे 'ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर' हे पुस्तक लॉन्च केले असून तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सिक्रेट ओपन केले आहेत.

अधिक वाचा : Naga Chaitanya:समंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्यला मिळालं नवं प्रेम! ‘या’ अभिनेत्रीचं नाव घेताच चेहऱ्यावर फुललं हसू

अनवान्टेड प्रेग्नेंसीमुळे गर्भपात 

या पुस्तकात कुब्रा सैतने स्वत:सोबत झालेल्या शारीरिक शोषणापासून ते बॉडी शेमिंगपर्यंतच्या घटनांबद्दल सांगितले आहे. यासोबतच अभिनेत्रीने या पुस्तकात तिच्या नको असलेल्या प्रेग्नेंसीबद्दलही खुलासा केला आहे. कुब्ब्राने सांगितले की, तिला आई व्हायचे नव्हते, त्यामुळे तिने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा : Mahesh Babu: Bollywood ला मी परवडणार नसल्याचं वक्तव्य करणारा महेश बाबूचं लवकरच हिंदी सिनेमात डेब्यू


सहलीला गेलेल्या मित्राशी जवळीक 

पुस्तकात अभिनेत्रीने सांगितले की 2013 मध्ये वन नाईट स्टँडनंतर ती गर्भवती झाली होती, त्यानंतर तिला गर्भपात करावा लागला होता. त्यावेळी अभिनेत्रीचे वय 30 वर्षे होते. अभिनेत्रीने खुलासा केला की ती त्या वेळी अंदमानला ट्रीपला गेली होती, जिथे तिने मद्यपान केल्यानंतर एका मित्राशी जवळीक साधली, काही दिवसांनंतर तिने गर्भधारणा चाचणी केली ती पाॅझिटिव्ह आली.

अधिक वाचा : Salman Khan: बुलेट प्रूफ गाडीमधून एअरपोर्टवर पोहोचला सलमान खान


स्त्रियांवर लग्नाचा आणि मुलांचा दबाव

अलीकडेच, अभिनेत्रीने टाइम्स डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील या घटनेबद्दल देखील सांगितले. ती म्हणाली, "मला वाटते की मी त्यावेळी त्यासाठी तयार नव्हते. मला अजूनही वाटत नाही की मी त्यासाठी तयार आहे. वयाच्या 23 व्या वर्षी लग्न करण्याचा आणि त्यानंतर वयापर्यंत मुले जन्माला घालण्यासाठी महिलांवरील दबाव मला समजतो. 


अभिनेत्री कुब्रा सैतने अभिनेता सलमान खानच्या रेडी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिची खूप छोटी भूमिका होती, परंतु त्यानंतर अभिनेत्रीने जवानी जानेमन, सुलतान, सिटी ऑफ लाइफ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले, परंतु ओटीटी मालिका सेक्रेड गेम्सने तिला खऱ्या अर्थाने वेगळी ओळख दिली. कुब्रा सैत तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्डनेसने जास्त वरचढ आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी