ही आहे अल्लू अर्जुनची रियल लाईफ श्रीवल्ली ! तिच्या ग्लॅमरस लूकपुढे बाॅलिवूड एक्ट्रेस फिक्या

Allu Arjun's wife : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन हा इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. अल्लूने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने बॉक्स ऑफिसवर घबराट निर्माण केली आहे. अभिनेते त्यांच्या दमदार अभिनयाने आणि कृतीने लाखो हृदयांवर राज्य करतात. आज आम्ही तुम्हाला अल्लू अर्जुनची रिअल लाइफ श्रीवल्ली स्नेहा रेड्डीबद्दल सांगणार आहोत, जी एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही.

This is Allu Arjun's Real Life Srivalli! Bollywood actresses fall in front of glamorous looks
ही आहे अल्लू अर्जुनची रियल लाईफ श्रीवल्ली ! ग्लॅमरस लूकपुढे बाॅलिवडू एक्ट्रेस पडतात फिक्का  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • पुष्पा स्टार अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेडी आहे त्याची रिअल लाईफ श्रीवल्ली
  • स्नेहा दिसायला खूप सुंदर आहे. यासोबतच खूप ग्लॅमरस आहे.
  • स्नेहा सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री किंवा मॉडेलपेक्षा कमी नाही.

मुंबई   : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये चांगलीच कमाई करत आहे. हा चित्रपट दक्षिणेतच नव्हे तर उत्तर भारतातही धमाकेदार कमाई करत अनेक विक्रम नोंदवत आहे. पुष्पा हा चित्रपट जबरदस्त कमाई करून भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर पुष्पा सलग चौथ्या आठवड्यात चांगली कमाई करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पुष्पाभाऊ अर्थात अल्लू अर्जुनची रियल लाईफ श्रीवल्ली कोण आहे? (This is Allu Arjun's Real Life Srivalli! Bollywood actresses fall in front of glamorous looks)

साऊथ स्टार अल्लू अर्जुनची त्यांची पत्नी स्नेह ही त्यांची खऱ्या आयुष्यातील श्रीवल्ली आहे. अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा दिसायला खूप सुंदर आहे. यासोबतच स्नेहाही खूप ग्लॅमरस आहे. तिने अमेरिकेत राहून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. 
स्नेहाने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवली असून तिचे वडील हैदराबादचे प्रसिद्ध व्यापारी आहेत. अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी एका मित्राच्या लग्नादरम्यान भेटले होते. अल्लू अर्जुनने 6 मार्च 2016 रोजी हैदराबाद शहरात स्नेहा रेड्डीसोबत लग्न केले. अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री किंवा मॉडेलपेक्षा कमी नाही.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून स्वत:बद्दल आणि कुटुंबाबद्दल अपडेट करत असते. अलीकडेच अल्लू अर्जुनच्या बेटरहाफने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी अवघड योगा पोज देताना दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी