OTT release september 2022:  सप्टेंबर महिन्यात ओटीटीवर हे चित्रपट आणि वेबसीरीज होणार प्रदर्शित, पॉपकॉर्न ठेवा तयार

सप्टेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांना ओटीटीवर मोठी ट्रीट मिळणार आहे. प्रेक्षकांना घरबसल्या आपल्या टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईलवर नवे चित्रपट आणि वेबसीरीज पाहता येणार आहे. या महिन्यात मोठी स्टारकास्ट असलेल्या हॉलिवूड आणि बॉलिवूडचे चित्रपट आणि वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे. जाणून घेऊया ओटीटीवर सप्टेंबर महिन्यात कुठल्या वेबसीरीज आणि चित्रपट रीलीज होणार आहे.

movies on ott
मूवीज ओटीटी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सप्टेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांना ओटीटीवर मोठी ट्रीट मिळणार आहे.
  • प्रेक्षकांना घरबसल्या आपल्या टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईलवर नवे चित्रपट आणि वेबसीरीज पाहता येणार आहे.
  • या महिन्यात मोठी स्टारकास्ट असलेल्या हॉलिवूड आणि बॉलिवूडचे चित्रपट आणि वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे.

OTT release september 2022:  मुंबई : सप्टेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांना ओटीटीवर मोठी ट्रीट मिळणार आहे. प्रेक्षकांना घरबसल्या आपल्या टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईलवर नवे चित्रपट आणि वेबसीरीज पाहता येणार आहे. या महिन्यात मोठी स्टारकास्ट असलेल्या हॉलिवूड आणि बॉलिवूडचे चित्रपट आणि वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे. जाणून घेऊया ओटीटीवर सप्टेंबर महिन्यात कुठल्या वेबसीरीज आणि चित्रपट रीलीज होणार आहे. (thor love and thunder, rings of the power and many more movies and web series will release in September month read in marathi)


कठपुतली (डिस्ने+हॉटस्टार)


अक्षय कुमार आणि रकुल प्रीतची कठपुतली २ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट डिस्ने+हॉटस्टॉरवर रीलीज होणार आहे. अक्षयचा हा चित्रपट तमिळ चित्रपट रतसासनचा रिमेक आहे. 


खुदा हाफिज चॅप्टर 2- अग्नि परीक्षा (झी 5)

विद्युत जमवाल आणि शिवालिक यांचा खुदा हाफिज चॅप्टर २ झी ५ ला २ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 


द लॉर्ड ऑफ रिंग्स : द रिंग्स ऑफ पावर (ऍमेझॉन प्राइम) 

द लॉर्ड ऑफ रिंग्स या चित्रपटाची सीरीज चांगलीच गाजली होती. आता या चित्रपटाचा प्रिक्वेल द रिंग्स ऑप पॉवर ऍमेझॉन प्राईमवर २ सप्टेंबरला रीलीज होणार आहे. 


थॉर लव ऍन्ड थंडर (डिस्ने+ हॉटस्टार)

मार्वलचा थॉर हा सुपरहिरो भारतातही लोकप्रिय आहे. थॉर लव ऍन्ड थंडर थिएटवर रीलीज झाला होता आणि प्रेक्षकांना पसंतही पडला होता. आता ८ सप्टेंबरला डिस्ने+ हॉटस्टारवर रीलीज होणार आहे. 


 जोगी (नेटफ्लिक्स)

दिलजीत दोसांझ, अमायरा दस्तूर, कुमुद मिश्रा आणि झिशान अयूब जोगी चित्रपटात दिसणार आहे. १६ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रीलीज होणार असून १९८४ साली झालेल्या शीख विरोधी दंगलीवर हा चित्रपट आधारित आहे. 

बबली बाउंसर (डिस्ने+हॉटस्टार)

मधूर भांडारकर दिग्दर्शित बबली बाऊन्सर चित्रपटात तमन्ना भाटियाची प्रमुख भूमिका आहे. २३ सप्टेंबरला डिस्ने + हॉटस्टारला हा चित्रपट रीलीज होणार आहे. 

प्लान ए प्लान बी (नेटफ्लिक्स)

तमन्ना भाटिया आणि रितेश देशमुख यांच्या प्लान ए प्लान बी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल आहे. ३० सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी