नवी दिल्ली: Hollywood Star David Warner Death: ब्रिटिश हॉलिवूड एक्टर डेव्हिड वॉर्नर (British Hollywood actor David Warner) यांचे निधन झालं (passed away) आहे. ते 80 वर्षांचे होते. ते गेल्या काही काळापासून कॅन्सरशी (cancer) झुंज देत होते. डेव्हिड यांचं लंडनमधील डॅनविले हॉलमध्ये निधन झालं. शेक्सपियरच्या कथांवर आधारित सिनेमांपासून ते सायन्स फिक्शन कल्ट क्लासिक्सपर्यंतच्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
कुटुंबीयांनी जारी केलं निवेदन
वॉर्नर अनेकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते. बीबीसीच्या वृत्तानुसार, त्यांच्या मृत्यूची माहिती देताना त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, गेल्या 18 महिन्यांपासून त्यांच्या आजारावर उपचार सुरू होते. या निवेदनात कुटुंबाने पुढे म्हटलं आहे की, आम्हाला, कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांना त्यांची खूप आठवण येईल. ते एक दयाळू आणि उदार व्यक्ती होते. त्यांच्या असामान्य कार्याने गेल्या काही वर्षांत अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला. आमचे दुःख झाले आहे.
अधिक वाचा- लवकरच 5G नेटवर्क; 'अशी' बदलणार कॉल, इंटरनेट वापरण्याची पद्धत
डेव्हिड यांनी 1971 च्या सायकोलॉजिकल थ्रिलर स्ट्रॉ डॉग्स, 1976 च्या हॉरर क्लासिक द ओमेन, 1979 मधील टाइम-ट्रॅव्हल अॅडव्हेंचर टाइम आफ्टर टाइम - तो जॅक द रिपर आणि 1997 च्या ब्लॉकबस्टर टायटॅनिकमध्ये मुख्य भूमिका बजावल्या होत्या.
डेव्हिड वॉर्नर यांनी लंडनमधील रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. डेव्हिड त्या काळात रॉयल शेक्सपियर कंपनीचा तरुण स्टार बनले होते. 'किंग हेन्री VI' आणि 'किंग रिचर्ड II' यासह शेक्सपियरच्या सिनेमांमध्ये त्यांनी अनेक भूमिका केल्या. पीटर हॉल दिग्दर्शित कंपनीसाठी 1965 मध्ये 'हॅम्लेट' मध्ये त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा त्या पिढीतील उत्कृष्ट अभिनयांपैकी एक मानली गेली होती.
अधिक वाचा- ''शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही'', आमदार संजय शिरसाट यांचा इशारा
अशी होती त्यांची अभिनयाची कारकीर्द
वॉर्नर त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी खूप प्रसिद्ध होते. त्यांनी 'ट्रॉन' (1982), 'लिटिल माल्कम' (1974), 'टाईम बॅंडिट्स' (1981), 'द फ्रेंच लेफ्टनंट वुमन' (1981), 'द मॅन विथ' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय 2018 साली आलेल्या मेरी पॉपिन्सच्या सिक्वेलमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मोठ्या पडद्याशिवाय वॉर्नरने टीव्हीच्या दुनियेतही बरेच काम केलं होतं. 'पेनी ड्रेडफुल,' 'रिपर स्ट्रीट,' 'स्टार ट्रेक,' 'डॉक्टर हू' हे त्यांचे काही प्रमुख टीव्ही शो होते.
या सिनेमांमुळे मिळाली ओळख
वॉर्नर यांचा जन्म 1941 साली मँचेस्टरमध्ये झाला. 1997 मध्ये रिलीज झालेल्या जेम्स कॅमेरॉनच्या टायटॅनिक सिनेमात ते स्पायसर लव्हजॉयच्या भूमिकेत दिसले होते. 1976 च्या हॉरर क्लासिक 'द ओमेन' मधील फोटोग्राफर कीथ जेनिंग्जच्या भूमिकेसाठीही ते ओळखला जातात.
मसडासाठी जिंकला एमी अवॉर्ड
डेव्हिड वॉर्नर यांनी 1981 च्या टीव्ही मिनीसिरीज मसाडामध्ये रोमन राजकारणी पोम्पोनियस फाल्कोच्या भूमिकेसाठी एमी पुरस्कार जिंकला होता. यूके आणि अमेरिकन फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये त्यांची उत्कृष्ट कारकीर्द आहे.