Kaushani Mukherjee Pics: 28 वर्षीय कौशानी मुखर्जीला टीएमसीने दिले तिकीट, आपल्या हॉट अंदाजासाठी प्रसिद्ध

झगमगाट
Updated Mar 20, 2021 | 18:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

बंगाली अभिनेत्री कौशानी मुखर्जीला तृणमूल काँग्रेसने विधानसभेचे तिकीट दिले आहे. ती कृष्णसागर या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ती तिच्या हॉट अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. जाणून घ्या तिच्याबद्दल.

Kaushani Mukherjee
28 वर्षीय कौशानी मुखर्जीला टीएमसीने दिले तिकीट, आपल्या हॉट अंदाजासाठी प्रसिद्ध 

थोडं पण कामाचं

  • काही दिवसांपूर्वीच केला होता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
  • 17 लाखांपेक्षाही जास्त आहेत कौशानीचे इंस्टाग्राम फॉलोअर्स
  • कौशानीला व्हायचे होते आयकर अधिकारी

TMC candidate Actress kaushani Mukherjee hot photograph: बंगाली अभिनेत्री (Bengali actress) कौशानी मुखर्जीला (Kaushani Mukherjee) तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) विधानसभेचे (state assembly) तिकीट (ticket) दिले आहे. ती कृष्णसागर (Krishnasagar) या मतदारसंघातून (constituency) आगामी विधानसभा निवडणूक (election) लढवणार आहे. ती तिच्या हॉट अंदाजासाठी (hot attitude) प्रसिद्ध (famous) आहे. सध्या ती सुती साडी आणि सूट घालून प्रचारात गुंतली आहे.

Koushani Mukherjee

काही दिवसांपूर्वीच केला होता तृणमूलमध्ये प्रवेश

28 वर्षीय कौशानी मुखर्जीने निवडणुकांची घोषणा होण्याच्या काही काळ आधीच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिला तिकीट दिले. कौशानी सध्या पूर्ण जोमात निवडणुकीचा प्रचार करत आहे आणि विजयासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

Koushani Mukherjee

17 लाखांपेक्षाही जास्त आहेत कौशानीचे इन्स्टाग्राम फॉलोवर्स

कौशानी मुखर्जीचे इंस्टाग्राम खाते हॉट आणि बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. ती दररोज आपले सुंदर फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. तिला इंस्टाग्रामवर 17 लाखांपेक्षाही जास्त लोक फॉलो करतात. गेले अनेक दिवस ती प्रसिद्ध अभिनेता बॉनी सेनगुप्ताला डेट करत आहे. खास गोष्ट अशी की कौशानीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर बॉनी सेनगुप्ताने भाजपाच्या हातात हात मिळवला आहे.

Koushani Mukherjee

कौशानीला व्हायचे होते आयकर अधिकारी

Koushani Mukherjee

कौशानी मुखर्जीला तिच्या वडिलांसारखेच सरकारी नोकरीत जाऊन आयकर विभागात अधिकारी व्हायचे होते. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ती टीव्ही मालिका आणि अॅड फिल्म्समध्ये काम करत होती. कौशानी मुखर्जीने कोलकाता इथूनच आपले शालेय शिक्षण आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिने आपल्या चाहत्यांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी