Hanuman Chalisa : 'हनुमान चालीसा' लाभली, टी सीरिजच्या You Tube चॅनलवर रेकॉर्ड, अब्जावधी लोकांनी बघितला Video

tseries hanuman chalisa becomes first video to cross 3 billion views on youtube sung by hariharan : टी सीरिजच्या यू ट्युब चॅनलवर असलेला 'हनुमान चालीसा'चा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 3 अब्जपेक्षा जास्त (300 कोटींपेक्षा जास्त) नागरिकांनी बघितला आहे. 

tseries hanuman chalisa
'हनुमान चालीसा' लाभली, टी सीरिजच्या You Tube चॅनलवर रेकॉर्ड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 'हनुमान चालीसा' लाभली, टी सीरिजच्या You Tube चॅनलवर रेकॉर्ड
  • असा आहे टी सीरिजच्या 'हनुमान चालीसा'चा व्हिडीओ
  • 5G आणि 4K Video च्या काळात जुना व्हिडीओ सुपरहिट

tseries hanuman chalisa becomes first video to cross 3 billion views on youtube sung by hariharan : जगातील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म अशी ओळख मिरविणाऱ्या यू ट्युबवर 'हनुमान चालीसा'चे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. पण टी सीरिजच्या यू ट्युब चॅनलवर असलेला 'हनुमान चालीसा'चा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 3 अब्जपेक्षा जास्त (300 कोटींपेक्षा जास्त) नागरिकांनी बघितला आहे. 

गुलशन कुमार यांनी टी सीरिज या म्युझिक कंपनीची दिल्लीत 11 जुलै 1983 रोजी स्थापना केली. संगीताच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या टी सीरिजने 13 फेब्रुवारी 2011 रोजी टी सीरिज भक्ती सागर (T-Series Bhakti Sagar) नावाचा यू ट्युब चॅनल सुरू केला. या चॅनलवर 10 मे 2011 रोजी एक 'हनुमान चालीसा'चा व्हिडीओ अपलोड करण्यात आला. या व्हिडीओत टी सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार 'हनुमान चालीसा' म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 3 अब्जपेक्षा जास्त (300 कोटींपेक्षा जास्त) नागरिकांनी बघितला आहे. ही कामगिरी करणारा हा पहिला भारतीय व्हिडीओ आहे. या व्हिडीओने 100 कोटी दर्शकांचा टप्पा 2021 मध्ये ओलांडला आणि मार्च 2023 मध्ये 300 कोटीपेक्षा जास्त दर्शकांचा टप्पा (viewers) ओलांडला. विशेष म्हणजे आजही या व्हिडीओची लोकप्रियता कायम आहे. व्हिडीओ बघणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. 

भारतात भक्तिभावाने 'हनुमान चालीसा'चा व्हिडीओ बघणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचाही टी सीरिजच्या 'हनुमान चालीसा'च्या व्हिडीओला फायदा झाला.

असा आहे टी सीरिजच्या 'हनुमान चालीसा'चा व्हिडीओ

टी सीरिजच्या 'हनुमान चालीसा'च्या व्हिडीओत कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार 'हनुमान चालीसा' गाताना दिसत आहेत. पण आवाज गायक हरिहरन यांचा आहे. एकेकाळी गुलशन कुमार टी सीरिजच्या भक्तिगीतांमध्ये हमखास दिसायचे. ना भक्तिगीते आणि भजनाचा राजा म्हणत.  गुलशन कुमार यांना 'कॅसेट किंग' या नावानेही ओळखले जायचे. गुलशन कुमार हे भगवान शिव आणि माता वैष्णो देवीचे भक्त होते. वैष्णोदेवीच्या भक्तीत ते इतके रमले होते की त्यांनी वैष्णोदेवी मंदिराजवळील बाण गंगेत मोफत खाण्यापिण्याची व्यवस्था सुरू केली होती. व्यावसायिक स्पर्धेतून गुलशन कुमार यांची 1997 मध्ये मुंबईत हत्या झाली. यू ट्युबवर कोट्यवधी दर्शकांनी बघितलेला 'हनुमान चालीसा'चा व्हिडीओ हा मुळात टी सीरिज कंपनीचा जुना 'हनुमान चालीसा'चा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ टी सीरिजने 10 मे 2011 रोजी त्यांच्या यू ट्युब चॅनवर अपलोड केला. 

5G आणि 4K Video च्या काळात जुना व्हिडीओ सुपरहिट

भारतात फाईव्ह जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि फोर के व्हिडीओ असे दर्जेदार तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या दोन तांत्रिक क्षमतांमुळे उच्च दर्जाच्या व्हिडीओंची निर्मिती करणे तसेच ते व्हिडीओ यू ट्युबवर अपलोड करणे आणि यू ट्युबवर बघणे सोपे झाले आहे. या बदलत्या वातावरणातही यू ट्युबवर असलेला टी सीरिज कंपनीचा जुना 'हनुमान चालीसा'चा व्हिडीओ आजही लोकप्रिय आहे. दररोज हा व्हिडीओ बघणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.

सतीश कौशिकच्या अंत्यसंस्काराला गैरहजर होते हे 10 मित्र

मृत्यूच्या दाढेतून परतलेले सेलिब्रेटी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी