Urfi Javed : उर्फी जावेदला बलात्काराच्या धमक्या, हतबल झाल्याचीही दिली प्रतिक्रिया, इन्स्टा पोस्ट व्हायरल

आपल्या विचित्र फॅशनसाठी चर्चेत असलेल्या उर्फी जावेदला बलात्काराच्या धमक्या आल्या आहेत. यामुळे आपण हतबल झाल्याचेही तिने सांगितले आहे. नेहमीच विचित्र आणि बोल्ड कपड्यामुळे उर्फी ट्रोल होत असते. तसेच सोशल मीडियावर उर्फी जावेदचा लूकही व्हायरल होत असतो.

urfi javed
उर्फी जावेद  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • आपल्या विचित्र फॅशनसाठी चर्चेत असलेल्या उर्फी जावेदला बलात्काराच्या धमक्या आल्या आहेत.
  • यामुळे आपण हतबल झाल्याचेही तिने सांगितले आहे.
  • नेहमीच विचित्र आणि बोल्ड कपड्यामुळे उर्फी ट्रोल होत असते.

Urfi Javed  : मुंबई : आपल्या विचित्र फॅशनसाठी चर्चेत असलेल्या उर्फी जावेदला बलात्काराच्या धमक्या आल्या आहेत. यामुळे आपण हतबल झाल्याचेही तिने सांगितले आहे. नेहमीच विचित्र आणि बोल्ड कपड्यामुळे उर्फी ट्रोल होत असते. तसेच सोशल मीडियावर उर्फी जावेदचा लूकही व्हायरल होत असतो. आता उर्फीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच उर्फीने माध्यमांवरही राग व्यक्त केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेदने आपल्या इन्स्टा स्टोरी पोस्टमध्ये म्हटाले होते की, सातत्याने मला धमक्या दिल्या जात आहे, मला ट्रोल केले जात आहे तसेच मला बलात्काराच्या धमक्याही दिल्या जात आहेत. परंतु हे आयुष्य असेच चालले पाहिजे असे मला वाटते. आपण स्वतःला सांभाळले पाहिजे, जे लोक तुम्हाला समजू शकत नाही त्यांना काही फरक पडत नाही. सध्या मी ठीक आहे, आजचा दिवस खूपच विचित्र आहे. मी हतबल झाले आहे आणि या लढाईतून हार पत्करावी असे वाटत आहे. मला नेहमीच शिव्या दिल्या जातात, ट्रोल केले जाते, बलात्काराच्या धमक्या दिला जातात असेही उर्फीने म्हटले आहे.


या इन्स्टा स्टोरीवर उर्फीने माध्यमांवरही आपला राग व्यक्त केला आहे. उर्फी म्हणाली की, मीडियावर जेव्हा माझ्या बाबतीत बातम्या प्रसारित होतात तेव्हा हेडलाईन्स असतात की उर्फीने अश्लीलतेच्या मर्यादा सोडल्या, उर्फी जावेद नग्न झाली आहे. केव्हापासून आपण महिलांच्या अंतरवस्त्रांबाबत चर्चा करण्यास सुरूवात केली आहे? असा सवाल उर्फीने उपस्थित केला आहे. तसेच माध्यमं आपल्या अंडरगार्मेंट्सबद्दल का लिहित आहेत? मी चड्डी, ब्रा नाही घातली याच्याशी तुम्हाला काय घेणे आहे? तुम्ही चड्डी घातली हे बघा या शब्दांत उर्फीने आपला राग व्यक्त केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी