Ved movie Box Office Collection Day 4: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचा वेड सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया (Genelia Deshmukh) यांच्या वेड सिनेमाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. 30 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला (Ved movie box office collection) आहे. या सिनेमात अभिनेता रितेश देशमुख याच्या अभिनयाचंही खूप कौतुक होत आहे. वेड सिनेमाने पहिल्याच वीकेंडवर दमदार कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जाणून घ्या रितेश आणि जेनेलिया यांच्या सिनेमाने आतापर्यंत किती कोटींचा गल्ला जमवला आहे. (Ved movie Box Office Collection Day 4 read in marathi)
रितेश देशमुख याने वेड हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. पती-पत्नी असलेले रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी असलेल्या वेड सिनेमाने सर्वांची मनं जिंकली आहेत. दोघांनीही आपल्या दमदार अभिनय केला आहे. सिने समिक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच वेड सिनेमाने अक्षरश: वेड लावलं आहे.
हे पण वाचा : जानेवारी 2023 मध्ये या ठिकाणी करा गुंतवणूक, मिळवा सुरक्षित अन् जबरदस्त रिटर्न्स
वेड सिनेमा 30 डिसेंबर रोजी सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला आहे. रिलीज झाल्यावर चौथ्या दिवशी म्हणजेच (2 जानेवारी 2023) पर्यंत वेड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. वेड सिनेमाने चौथ्या दिवशी सुद्धा चांगला गल्ला जमवला आहे.
हे पण वाचा : गरोदरपणात काळी मिरी खाण्याचे अनेक फायदे
सिने समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत सिनेमाच्या पहिल्या तीन दिवसांची कमाईची माहिती दिली आहे. त्यानुसार सिनेमाने पहिल्या दिवशी 2.25 कोटी रुपयंचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी 3.25 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 4.25 कोटी रुपये इतका गल्ला जमवला. अशा प्रकारे वेड सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत 10 कोटींचा पल्ला गाठला.
2022 ends with a BANG … #Marathi film #Ved - which marks the directorial debut of #RiteishDeshmukh - takes a SOLID START on Day 1 and witnesses REMARKABLE GROWTH on Day 2 and 3… Fri 2.25 cr, Sat 3.25 cr, Sun 4.50 cr. Total: ₹ 10 cr. pic.twitter.com/qJLDx4MHBc — taran adarsh (@taran_adarsh) January 2, 2023
कोरोना काळानंतर सर्वाधिक कमाई करणारा वेड हा सिनेमा ठरला आहे. आतापर्यंत सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. पहिल्या चार दिवसांतच बॉक्स ऑफिस वेड सिनेमाने गाजवलं आहे.
हे पण वाचा : जेवल्यावर अद्रक चघळण्याचे अनेक फायदे