Vicky Kaushal On Engagement : कतरिना कैफसोबतच्या साखरपुड्याबाबत विकी कौशलने सोडले मौन

झगमगाट
Updated Oct 17, 2021 | 15:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. आता विकीने कतरिनासोबतच्या साखरपुढ्यावर आपले मौन सोडले आहे.

 Vicky Kaushal On Engagement : Vicky Kaushal breaks silence over Engagement with Katrina Kaif
Vicky Kaushal On Engagement : कतरिना कैफसोबतच्या साखरपुड्याबाबत विकी कौशलने सोडले मौन ।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल सध्या त्याच्या सरदार उधम या चित्रपटामुळे चर्चेत आहे
  • विकी कौशल कतरिना कैफला डेट करत आहे.
  • कतरिना कैफसोबतच्या साखरपुड्याबाबत विकी कौशलने सोडले मौन


मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल सध्या त्याच्या 'सरदार उधम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याचे वैयक्तिक आयुष्यही बऱ्याचदा चर्चेत असते. काही दिवसांपासून विकी कौशल बद्दल बातम्या येत आहेत की तो कतरिना कैफला डेट करत आहे. अधिकृतपणे या प्रकरणी कतरिना कैफने काहीही म्हटले नाही किंवा विकी कौशलनेही काहीही सांगितले नाही. (Vicky Kaushal On Engagement: Vicky Kaushal breaks silence over Engagement with Katrina Kaif)

अलीकडेच, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्न केल्याची बातमी आली. मात्र, नंतर ही बातमी केवळ अफवा असल्याचे म्हटले. सध्या विकी कौशल त्याच्या सरदार उधम या चित्रपटाचे प्रमोशन जोरात करत आहे. या दरम्यान, अभिनेता एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलला.


विकी कौशलने साखरपुढ्याववर मौन सोडले

विकी म्हणाला, 'या सगळ्या अफवा ज्या केवळ मीडियामुळे निर्माण झाल्या आहेत. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपण साखरपुढा करुच. मुलाखतीदरम्यान विकी हसला आणि म्हणाला, 'अशा प्रकारच्या बातम्या फक्त तुमच्या मित्रांकडून पसरवल्या जातात. लवकरच मी सुद्धा एंगेजमेंट करेन .. वेळ मिळेल तेव्हा. ती वेळ सुद्धा लवकरच येईल.


विकी-कतरिना अफेअर

विक्की कौशल आणि कतरिना कैफच्या अफेअरच्या बातम्यांनी जेव्हा हे जोडपे अंबानीच्या होळी पार्टीत एकत्र दिसले तेव्हा हेडलाईन्स बनले. त्यानंतर, विकी कौशल अनेक वेळा कतरिना कैफच्या घरी जाताना दिसला आणि कधीकधी दोघेही काही कार्यक्रमात एकत्र येताना दिसले. विकीच्या सरदार उधम या चित्रपटाचे स्क्रीनिंग शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते, ज्यात कतरिना कैफही पोहोचली होती.


कौटुंबिक प्रतिक्रिया

विकी कौशलचा भाऊ सनी कौशल म्हणाला होता की, मला आठवते की जेव्हा विक्की सकाळी जिमला गेला होता, त्यावेळी साखरपुढ्याच्या बातम्या येऊ लागल्या. जेव्हा तो घरी परत आला, तेव्हा आई आणि वडील म्हणाले - तू साखरपुढा झाला. आता मिठाई खायला देणार नाही का?  त्यावर विक्की म्हणाला, जेवढा खरा साखरपुढा झाला. तेवढीच खरी मिठाई खा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी