Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली, पुण्यातील रुग्णालयात दाखल

Vikram Gokhale health updates: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Vikram Gokhale hospitalise in pune deenanath mangeshkar hospital in critical condition read details in marathi
Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली, पुण्यातील रुग्णालयात दाखल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली
  • पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू

Vikram Gokhale: ज्येष्ठ सिने अभिनेते विक्रम गोखले यांना प्रकृती खालावली असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहेत.

हे पण वाचा : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल या गोष्टींची घ्या काळजी

विक्रम गोखले यांनी मराठीच नाहीतर बॉलिवूड सिनेमांतही भूमिका केल्या आहेत. विक्रम गोखले यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. विक्रम गोखले हे सिनेसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटक, सिनेमा, मालिकांत भूमिका केल्या आहेत.

हे पण वाचा : चर्चेतील सनबर्न फेस्टिवल मुंबई-पुण्यात कधी, काय आहे तिकीट दर?

1971 मध्ये हिंदी सिनेमात एन्ट्री

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात 1971 मध्ये केली. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या परवाना सिनेमात त्यांनी भूमिका केली आहे. या सिनेमात पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांनी निगेटिव्ह रोल केला होता. 

विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 मध्ये पुण्यात झाला. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि आर्टिस्ट होते. विक्रम गोखले यांच्या परिवाराचं सिनेसृष्टीसोबत खूप जुनं नातं आहे. त्यांच्या कुटुंबीयांतील अनेकांनी सिनेमांत भूमिका केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी