...म्हणून रणबीर कपूरनं चाहत्याचा मोबाईल फेकला, अखेर सत्य आलं समोर

Ranbir Kapoor Viral video: एक दिवसापूर्वी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये रणबीर कपूरने रागाच्या भरात एका चाहत्याचा फोन फेकून दिला होता, त्यानंतर रणबीर कपूरच्या वृत्तीबद्दल बरीच चर्चा झाली होती. आता या मागचे खरे कारण समोर आले आहे.

Viral video: Ranbir angrily threw the fan's phone or is it something else?
...म्हणून रणबीर कपूरनं चाहत्याचा मोबाईल फेकला, अखेर सत्य आलं समोर ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणबीर कपूरचे पापाराझींसोबत गैरवर्तन
  • काल दिवसापूर्वी रणबीरचा संयम सुटला
  • फोटो काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या फॅनचा मोबाईल फेकला

Ranbir Kapoor Viral Video: रणबीर कपूर खूप कूल राहतो. विशेषत: मीडियासमोर तो कधीही रागावताना किंवा ओरडताना दिसला नाही. फोटो क्लिक केल्यानंतर तो निघून जातो आणि पापाराझींशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो. पण काल दिवसापूर्वी रणबीरचा संयम सुटला आणि तोही सर्व कॅमेऱ्यांसमोर. शुक्रवारी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला ज्यामध्ये एक चाहता रणबीरसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वारंवार क्लिक करूनही तो फोटो क्लिक झाला नाही, त्यामुळे रणबीर संतापला आणि त्याने चाहत्याचा फोनच फेकून दिला. (Viral video: Ranbir angrily threw the fan's phone or is it something else?)

अधिक वाचा : Pathaan box office : पठाण सिनेमाने 2 दिवसांत केली एवढी कमाई

सगळे पाहून थक्क झाले

रणबीरची अशी वागणूक पहिल्यांदाच मीडियासमोर दिसली. त्याचे हे रूप यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, त्यामुळे सर्वजण थक्क झाले. ही बातमी सोशल मीडियावरही वाऱ्यासारखी पसरली आणि रणबीरच्या चाहत्यांनाही हे कळताच धक्का बसला, मात्र आता हे प्रकरण आरशासारखे स्पष्ट झाले आहे. चाहत्याचा फोन अशा प्रकारे फेकण्याचे सत्य आता समोर आले आहे.


खरे तर हे सर्व एका जाहिरातीचा भाग होता. पापाराझींसमोर खऱ्या जाहिराती करताना प्रसिद्धीची ही पद्धत आजमावली गेली. ज्याचा फोन रणबीर कपूरने टाकला होता, त्याचवेळी त्याला नवा फोन देऊन त्याची जाहिरात करण्यात आली होती.

अधिक वाचा : Annu Kapoor : छातीत दुखू लागल्यामुळे अभिनेता अन्नू कपूर दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल

मात्र, सोशल मीडियावर चाहत्यांनी आधीच याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली होती. रणबीर कपूर सध्या त्याच्या 'तू झुठी मैं मकर' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. होळीच्या मुहूर्तावर 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी