Virat Anushka : करोडो कमावतात विराट-अनुष्का, मात्र लेकीसाठी ‘ही’ गोष्ट घ्यावी लागली भाड्याने, फोटो होतोय व्हायरल

भारतातील सर्वाधिक चर्चेत असणारं विराट आणि अनुष्का हे कपल सध्या लेकीसोबत सुट्टी एंजॉय करत आहे. या कपलला नुकतीच एक गोष्ट त्यांच्या लेकीसाठी भाड्याने घ्यावी लागली. त्याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

Virat Anushka
विराट अनुष्का सुट्टी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • विराट आणि अनुष्का लेकीसोबत साजरी करतायत सुट्टी
  • लेकीसाठी एक गोष्ट घेतली भाड्याने
  • अनुष्का शर्माने सादर केला फोटो

Virat Anushka | क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे भारतातील सतत चर्चेत असणारं कपल. दोघंही आपापल्या क्षेत्रात यशस्वी असून त्यांच्या भन्नाट केमिस्ट्रीमुळे या कपलचे अनेक चाहते आहेत. हे दोघं काय करतात, काय शेअर करतात, कुठे फिरायला जातात, कसे कपडे घालतात, काय बोलतात यासारख्या छोट्यामोठ्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांच्या फॅन्सचं बारीक लक्ष असतं. आपल्या फॅन्ससाठी हे दोघंही सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह असतात आणि काही फोटो शेअर करत असतात. मग या फोटोवर फॅन्सच्या अक्षरशः उड्या पडतात आणि प्रत्येक फोटोला लाखो लाईक्स आणि कमेंट्स येतात. अनुष्का शर्माने नुकताच टाकलेला एक फोटो सध्या असाच व्हायरल होत आहे. 

अनुष्का-विराट सुट्टीवर

सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सुट्टीवर आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी कन्या वामिकादेखील आहे. सुट्टी एंजॉय करत असतानाचा एक फोटो अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत एक सायकल दिसत आहे आणि त्यावर वामिका असं लिहिलं आहे. वास्तविक, ही सायकल त्यांनी आपल्या लेकीसाठी भाड्याने घेतली आहे. मात्र त्या सायकलवर वामिका हेच नाव लिहिलेलं असणं, हा योगायोग आहे. मुलीचा चेहरा दिसू न देता अनुष्कानं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला हजारो लाईक्स मिळत असून तिच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. 

मीडियापासून दूर

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामागे नेहमीच पापाराजी आणि मीडियाचा ससेमिरा असतो. ते जिथं जातील, तिथे काही पापाराजी त्यांचा पाठलाग करत असतात. या सगळ्यांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न हे दोघंही नेहमीच करत असतात. मात्र पापाराजींपासून पळ काढला, तरी चाहत्यांपासून मात्र ते पळ काढत नाहीत. आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटनांपैकी काही निवडक घटनांचे फोटो आणि व्हिडिओ ते त्यांच्या सोशल मीडियावरून अपलोड करत असतात आणि चाहत्यांना सुखद धक्के दत असतात. असाच धक्का सध्या अनुष्का आणि विराट या जोडीनं दिला आहे. 

अनुष्काचा नवा सिनेमा

अनुष्का शर्मा सध्या नव्या सिनेमाच्या तयारीत आहे. सुट्टीनंतर पुन्हा एकदा नव्या सिनेमाच्या कामाला ती स्वतःला जुंपून घेणार आहे. अनुष्का शर्मा लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’ या नव्या सिनेमात दिसणार आहे. हा चित्रपट झूलन गोस्वामीचा बायोपिक आहे. झूलन ही भारतीय महिला क्रिकेट टीमची माजी कॅप्टन होती. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात अनुष्कानं या सिनेमाचा टीजर शेअर केला होता. पुढच्या वर्षी म्हणजेच 2 फेब्रुवारी 2023 या दिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

अधिक वाचा - अक्षय कुमारचं नवीन आणि तरुण हिरोईनसोबत 'काम' फ्लॉप, याचे एक उदाहरण आहे ताजे

सुट्टीचा मनसोक्त आनंद

सध्या विराट आणि अनुष्का हे उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटत आहेत. वर्षातून दोन वेळा हे कपल एकमेकांसोबत सुट्टी साजरी करत असल्याचं यापूर्वी दिसून आलं आहे. दोघंही आपापल्या क्षेत्रात यशस्वी असले आणि अत्यंत बिझी असले तरी ते ठरवून एकमेकांसाठी वेळ काढत असल्याचं यातून पुन्हा एकदा दिसून आलं आहे. कुटुंबासाठी वेळ देणं आणि कामातून सुट्टी घेऊन काही काळ एकत्र घालवणं किती गरजेचं आहे, याचा वस्तुपाठ विराट आणि अनुष्का त्यांच्या चाहत्यांना घालून देत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी