Sanjay Dutt : संजय दत्त जेलमध्ये असताना जुन्या वर्तमानपत्रांपासून बनवायचा बॅगा; ४ वर्षात कमवला एवढा पैसा

झगमगाट
Updated Jan 10, 2022 | 18:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sanjay Dutt Jail Life | बॉलिवूड कलाकार संजय दत्तचे जीवन खूप चढ-उताराचे राहिले आहे. १९८० च्या दशकात अमली पदार्थांच्या कारणास्तव तो मोठ्या विवादात राहिला होता आणि त्यानंतर १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याच्यावर खटला चालवण्यात आला. लक्षणीय बाब म्हणजे संजय दत्त मोठ्या कालावधीपासून तुरूंगात देखील राहिला आहे. २००७ मध्ये १९९३ मधील प्रकरणात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला तुरूगांत टाकले होते.

While in jail Sanjay Dutt made Rs 500 by making bags from old newspapers
संजय दत्त जेलमध्ये जुन्या वर्तमानपत्रांपासून बनवायचा बॅगा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संजय दत्त मोठ्या कालावधीपासून तुरूंगात देखील राहिला आहे. २००७ मध्ये १९९३ मधील प्रकरणात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला तुरूगांत टाकले होते.
  • आम्ही तिथल्या जुन्या वर्तमानपत्रांपासून कागदी बॅगा बनवायचो. मला एक बॅग बनवण्यासाठी २० रूपये मिळायचे. असे संजय दत्तने म्हटले.
  • सिनेसृष्टीत संजूबाबा नावाने प्रसिध्द असलेल्या संजय दत्तने म्हटले की, त्याने तुरुंगात बॅगा बनवून सुमारे ४०० ते ५०० रुपये कमावले होते.

Sanjay Dutt Jail Life | नवी दिल्ली : बॉलिवूड कलाकार संजय दत्तचे जीवन खूप चढ-उताराचे राहिले आहे. १९८० च्या दशकात अमली पदार्थांच्या (Acidic Substances) कारणास्तव तो मोठ्या विवादात राहिला होता आणि त्यानंतर १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याच्यावर खटला चालवण्यात आला. लक्षणीय बाब म्हणजे संजय दत्त मोठ्या कालावधीपासून तुरूंगात (Jail) देखील राहिला आहे. २००७ मध्ये १९९३ मधील प्रकरणात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला तुरूगांत टाकले होते. २०१३ मध्ये उच्च न्यायालयाने (Supreme Court) देखील हा निर्णय कायम ठेवल्याने संजय दत्तने आत्नसमर्पण केले. त्यानंतर तो २०१३ ते २०१६ दरम्यान पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात होता. (While in jail Sanjay Dutt made Rs 500 by making bags from old newspapers). 

एक बॅग बनवण्यासाठी मिळत होते २० रूपये 

२०१८ मध्ये तुरूगांतून बाहेर आल्यानंतर संजय दत्तने त्याच्या तुरुंगातील घटनांना उजाळा देत काही आठवणींबाबत भाष्य केले. संजय दत्त टिव्ही शो 'मनोरंजनाची रात्र भाग २' मध्ये पोहोचला होता आणि त्यावेळी त्याने तुरुंगात असताना जुन्या वर्तमानपत्रांपासून कागदी बॅगा बनवून किती पैसे कमावले हे सांगितले. दरम्यान सतत चर्चेत असलेल्या संजय दत्तने सांगितले होते, 'आम्ही तिथल्या जुन्या वर्तमानपत्रांपासून कागदी बॅगा बनवायचो. मला एक बॅग बनवण्यासाठी २० रूपये मिळायचे. संजय दत्तने सांगितले की, तो एका दिवसात ५० ते १०० पर्यंत देखील बॅगा बनवायचा.

जेलमध्ये कमावले होते एवढे पैसे 

संजय दत्तने जवळपास ४ वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर त्याने या बॅगा बनवून किती पैसे कमावले आणि या पैशाचे काय केले याबाबत देखील माहिती दिली. सिनेसृष्टीत संजूबाबा नावाने प्रसिध्द असलेल्या संजय दत्तने म्हटले की, त्याने तुरुंगात बॅगा बनवून सुमारे ४०० ते ५०० रुपये कमावले होते. दरम्यान २०१६ मध्ये तुरुंगातून बाहेर येऊन त्याने हे पैसे पत्नी मान्यता दत्तला दिले. हे पैसे मी माझी पत्नी मान्यता हिला दिले होते. कारण हे असे उत्पन्न मला इतर कोठेही मिळू शकत नाही. ते ५०० रुपये माझ्यासाठी ५ हजार कोटी रुपयांच्या बरोबरीचे आहेत. असे त्याने सांगितले. २०१३ ते २०१६ पर्यंत संजय दत्त पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती आहे.

संजय दत्तच्या वैयक्तिक जीवनाबद्दल भाष्य करायचे झाले तर त्याने १९८७ मध्ये अभिनेत्री ऋचा शर्मासोबत लग्न केले होते. १९८८ मध्ये दोघांना एक मुलगी झाली त्रिशाला दत्त. १९९६ मध्ये ब्रेम ट्युमरच्या कारणास्तव ऋचाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने १९८८ मध्ये मॉडेल रिया पिल्लई सोबत लग्न केले मात्र २००८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर त्याने २००८ मध्ये गोव्यात मान्यता दत्तसोबत लग्न केले आणि २०१० मध्ये ते दोघेही दोन जुळ्या मुलांचे पालक झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी