Jeet Adani Diva Jaimin Shah Engagement Photo: भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यांचा धाकटा मुलगा जीत अदानीचा नुकताच साखरपुडा पार पडला. जीत अदानीने हिरे व्यापाऱ्याची मुलगी दिवा जैमीन शाहसोबत साखपुडा केला आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र हा साखरपुडा 12 मार्च 2023 रोजी संपन्न झाला. हा एंगेजमेंट सोहळा अतिशय खाजगी होता आणि फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.
जीत अदानी कोण आहे
गौतम अदानी यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण अदानी आणि लहान मुलाचे नाव जीत अदानी आहे. जीत अदानीचा जन्म 7 नोव्हेंबर 1997 रोजी झाला. त्याने अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. यानंतर, तो 2019 मध्ये भारतात परत आला आणि त्याने अदानी समूहाचे काम हाताळण्यास सुरुवात केली. यानंतर, 2022 मध्ये, जीत अदानीची अदानी ग्रुपमध्ये फायनान्समध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करण अदानी याचा विवाह कॉर्पोरेट वकील सेसिल श्रॉफ यांची मुलगी परिधी हिच्याशी 2013 मध्ये झाला होता. या लग्नात पीएम मोदीही सहभागी झाले होते. सध्या, करण अदानी हे अदानी पोर्ट आणि एसईझेड लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
कोण आहे दिवा दिवा जैमीन शाह?
विशेष म्हणजे गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर राहतो. डायमंड कंपनी सी. दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक जैमीन शाह यांची मुलगी दिवा शाह हिच्याशी तो विवाहबंधनात अडकणार आहे. जीत अदानी आणि दिवा जैमीन शाह पेस्टल पिंक ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. जीत अदानीने फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता तर दिवाने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता.
दिवा जैमीन शाहची एकूण संपत्ती किती आहे?
हिरे व्यापाऱ्याची मुलगी दिवा जैमीन शाह हिच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी दिवा लाइमलाइटपासून दूर राहतो. तिचा अद्याप एकच फोटो समोर आला आहे. मात्र, मिळालेल्या माहितीमुसार दिवा जैमीन शाह करोडोंची मालकीन आहे. ती विलासी जीवन जगते. दिव्याला व्यवसायाचीही चांगली जाण आहे.
अधिक वाचा: Bold Web Series : एकट्याने बघा या वेब सीरिज; कुटुंबासोबत पाहाल तर मिळतील दणके
जीत अदानी अब्जावधी संपत्तीचा मालक
गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी संपत्तीच्या बाबतीत मोठ्या उद्योजकांशी स्पर्धा करतो. जीत अब्जावधी संपत्तीचा मालक आहे. जीत 2019 मध्ये या ग्रुपमध्ये सामील झाला होता. तो अदानी पोर्ट्स आणि अदानी डिजिटल लॅबचा व्यवसाय पाहतो.
आनंदाचे क्षण
बऱ्याच दिवसांनी गौतम अदानी यांच्या घरी आनंद परतला असे म्हणायला हरकत नाही. 24 जानेवारीला हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला मोठा फटका बसला होता. शेअर्सच्या सततच्या घसरणीने अदानींच्या एकूण संपत्तीतही घट झाली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत अदानी 22 व्या क्रमांकावर पोहोचले आहे.
अधिक वाचा: Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 मध्ये दिसेल ही अभिनेत्री?
सुरत आणि मुंबईत कंपनी
दिवा ही सी. दिनेश अँड कंपनी प्रा. लि.चे मालक जैमीन शाह यांची मुलगी आहे. ही डायमंड कंपनी मुंबई आणि सुरत येथे आहे. ही कंपनी चिनू दोशी, दिनेश शहा यांनी सुरू केली होती. जैमिन शाह हे कंपनीचे संचालक आहेत.