कोण ठरणार Big boss मराठी सिझन ३ चा महाविजेता ? २६ डिसेंबर रोजी रंगणार या पर्वाचा Grand Finale!

बिग बॉस मराठी सिझन 3 चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 3 चा धम्माकेदार Grand Finale २६ डिसेंबर रोजी संध्या ७.०० पासून सुरु होणार आहे

Who will be the grand winner of Bigg Boss Marathi Season 3? The grand finale of this festival will be held on 26th December!
कोण ठरणार Big boss मराठी सिझन ३ चा महाविजेता ? २६ डिसेंबर रोजी रंगणार या पर्वाचा Grand Finale!  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस मराठी सिझन 3 चा १०० दिवसांचा प्रवास
  • १०० दिवसात हे सदस्य अनेक भाव भावनांना, अनेक चढउतारांना सामोरे गेले.
  • आता TOP ५ सदस्य उरले त्यातून कोण ठरणार आहे या पर्वाचा महाविजेता ! याकडे संपर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई :  तब्बल १०० दिवसांपूर्वी Big boss मराठी सिझन ३ ला सुरुवात झाली. घरामध्ये १५ स्पर्धकांना प्रवेश देऊन दरवाजा अनलाॅक झाला. यामध्ये स्पर्धकांना दिलेल्या टास्कने आणि वादांमुळे हे पर्वही पहिल्या दोन सिझन इतकंच गाजलं. पण आता वेळ आली आहे. शेवटचा दरवाजा उघडण्याची पण घरामध्ये आता TOP ५ सदस्य उरले त्यातून कोण ठरणार आहे या पर्वाचा महाविजेता ! याकडे संपर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. पण त्याची प्रतिक्षा संपली असून रविवारी दि. २६ डिसेंबर रोजी संध्या ७.०० वाजता बिग बॉस मराठी सिझन ३ चा Grand Finale रंगणार आहे. (Who will be the grand winner of Bigg Boss Marathi Season 3? The grand finale of this festival will be held on 26th December!)

बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वात प्रेक्षकांचे लक्ष वेधलं

बिग बाॅस मराठीचा होस्ट महेश मांजरेकर यांनी १०० दिवासांपूर्वी बिग बॉस मराठीच्या नव्या घरात १५ सदस्यांना एन्ट्री दिली. या १०० दिवसात हे सदस्य अनेक भाव भावनांना, अनेक चढउतारांना सामोरे गेले. कधी त्यांच्या हसण्याने तर कधी त्यांच्या भांडणाने तर कधी त्यांच्या रडण्याने तर कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने या चार भिंतींना, बिग बॉसच्या या घराला घरपण आलं. बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वातील प्रत्येक भागामध्ये झालेल्या टास्कने, वादाने, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

सदस्यांच्या प्रत्येक क्षणाचा घर साक्षीदार

या घरामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून सदस्यांनी मैत्रीच्या शपथा घेतल्या ज्यामधील काही सदस्यांनी त्या निभावल्या देखील. पहिल्या आठवड्यापासून घरामध्ये ग्रुप पडले. बिग बॉस मराठीच्या घराने पहिल्या दिवसापासून सदस्यांची भांडण बघितली, जसं जसे दिवस पुढे गेले सदस्यांमध्ये नाती बनताना बघितली आणि बदलताना देखील बघितली. सदस्यांच्या प्रत्येक क्षणाचा हे घर साक्षीदार राहिलं आणि त्यांच्या मागे उभं राहिलं.

प्रत्येक सदस्यामध्ये खेळाडूवृत्ती

एकएक सदस्य घरातून बाहेर जात होता. तेव्हा आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली. आता बघता बघता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता उरले TOP ५ सदस्य म्हणजेच विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा. बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांनी कार्यक्रम सुरु होताच प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळवण्यास सुरुवात केली. प्रत्येक सदस्यामध्ये खेळाडूवृत्ती ही होतीच... पण, या घराने उत्कर्षचं बुध्दीचातुर्य पाहिलं, मीनल - जय – विशालची टास्क जिंकण्याची जिद्द बघितली, मीराची चीडचीड आणि किचनवरच प्रेम पाहिलं, तृप्ती ताईंचा बेधडक अंदाज पहिला, सोनालीची अखंड बडबड ऐकली. त्यामुळे बिग बॉस मराठी सिझन ३ देखील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचला आणि कानाकोपर्‍यात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली.

पर्वातील Top २ सदस्य

१७ सदस्यांसोबत सुरू झालेला हा १०० दिवसांचा प्रवास कसा संपला हे कळलच नाही. आता या TOP ५ मधून कोणता सदस्य ठरणार बिग बॉस मराठी सिझन 3 चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. घराचा दरवाजा आता शेवटचा उघडणार... फरक इतकाच असणार की, यावेळेस दरवाजा पलीकडे उभे असणार आहेत बिग बॉस मराठीच्या या पर्वातील Top २ सदस्य आणि त्यातून कोण ठरणार आहे या पर्वाचा महाविजेता ! यावरुन लवकरच पडदा उचलला जाणार आहे. 

आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार असला तरीदेखील हे नातं मात्र अधिक दृढ झाले आहे यात शंका नाही. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 3 चा धम्माकेदार Grand Finale २६ डिसेंबर रोजी संध्या ७.०० पासून फक्त आपल्या कलर्स मराठीवर.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी