मल्याळम चित्रपटसृष्टीला (Malayalam film industry) ऑस्करमध्ये (Oscars) भारताचे प्रतिनिधित्व (Indian entry) करण्याची संधी फक्त २ वेळा मिळालेली आहे. मात्र आता जलीकट्टूमुळे (Jallikattu) त्यांना तिसऱ्यांदा ही संधी मिळाली आहे. १९९७ साली राजीव अंचल (Rajiv Anchal) यांनी दिग्दर्शित केलेला आणि मोहनलाल (Mohanlal) यांची प्रमुख भूमिका असलेला गुरू (Guru) हा चित्रपट ऑस्करसाठी निवडला गेलेला पहिला मल्याळम चित्रपट होता. यानंतर २००१मध्ये एडमिंटे मकन अबू (Adaminte Makan Abu) या चित्रपटाची निवड ऑस्करसाठी करण्यात आली होती ज्यात सलीम कुमार (Salim Kumar) आणि जरीना वाहाब (Zarina Wahab) मुख्य भूमिकेत होते. जलीकट्टू हा चित्रपट सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपटासाठीचा ऑस्कर (Best foreign language film) पटकावेल अशी सर्वांनाच आशा आहे. तब्बल ९ वर्षांनंतर मल्याळम चित्रपटसृष्टीला ही संधी मिळत आहे. ऑस्करचे निकाल पाहण्यासाठी आपल्याला २५ एप्रिल २०२१पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पण ऑस्कर पुरस्कारासाठी निवड होणे हीच प्रतिष्ठेची बाब आहे.
केंब्रिज शब्दकोशानुसार नायक ही अशी व्यक्तिरेखा असते जी खूप शूर आहे आणि त्याला काहीतरी मोठे कार्य साध्य करायचे आहे. जर ही व्याख्या इथे लावायचे ठरवले तर जलीकट्टू या चित्रपटात कोणताही हीरो किंवा नायक नाही. पण जर एक म्हैस किंवा रेडा चित्रपटाचा नायक होऊ शकत असेल तर याच शंभर टक्के एक नायक आहे. मानव आणि प्राणी यांच्यातली धूसर रेषा माणूस कशी ओलांडतो हे जलीकट्टू या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
जर आपण चित्रपटाबद्दल असा विचार करत असाल की याचे दिग्दर्शक लिजो जोसे पॅलिसरी यांनी या म्हशींचे चित्रीकरण कसे केले असेल, तर या चित्रपटात एकही खरी म्हैस नाही. मात्र या चित्रपटातील म्हशी या अतिशय अस्सल आणि जिवंत दिसतात ज्याचे श्रेय अॅनिमेट्रॉनिक्स टेक्नीक विभागाला जाते. यातील म्हैस दाखवण्यासाठी काही व्हीएफएक्स तंत्रांचाही वापर करण्यात आला आहे.
जलीकट्टू हा एक असा चित्रपट आहे जो प्रेक्षकांना बांधून ठेवतो. या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की कशी एक म्हैस आपला जीव वाचवण्यासाठी खाटकाच्या तावडीतून निसटते. हा चित्रपट खुर्चीवरून उठण्याची संधी देत नाही. चित्रपटात दाखवण्यात आलेली दृष्ये माणसांच्या माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. चित्रपटात पुरेसे नाट्य आहे, अनेक आनंदी क्षण आहेत. पण या सगळ्याचा एकत्रित विचार करणे अवघड आहे.
लिजो जोसे पॅलिसरी हे असे दिग्दर्शक आहेत जे नेहमीच स्टारपेक्षा जास्त विश्वास प्रतिभेवर ठेवतात. त्यामुळे जलीकट्टूमध्येही कोणतीही स्टारकास्ट नाही. मात्र यात काही नवे चेहरे नक्कीच पाहायला मिळतात. चित्रपटकर्ता हा नेहमी भूमिकेनुसार अभिनेते निवडतो. या चित्रपटात वर्गीस पेपे यांनी एक महत्वाची भूमिका साकारली आहे ज्यांनी याआधी फक्त दोन चित्रपट केले आहेत. तर चेंबर विनोद जोस या अनुभवी अभिनेत्यानेही महत्वपूर्ण भूमिका केली आहे. त्यांनी याआधी कोणत्याही मोठ्या बजेटच्या चित्रपटात काम केलेले नाही. या चित्रपटात साबुमन, अब्दुस्समद आणि संथी बालाचंद्रन यांच्याही भूमिका आहेत.