नवी दिल्ली: Deepika Padukone's look revealed in Pathaan poster: बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेला पठाण सिनेमा (Pathan movie) पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नुकतंच या सिनेमाचं एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आता दीपिका पदुकोणच्या पठाण सिनेमातील तिचा लूक समोर आला आहे. दीपिका पदुकोणनं स्वतः या सिनेमाचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (Instagram account) शेअर केला आहे.
या व्हिडिओत ती हातात बंदूक घेऊन दिसत आहे. दीपिका पदुकोण लवकरच शाहरुख खानसोबत 'पठाण' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंग बरेच दिवस सुरू होते, जे आता संपले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. या सिनेमाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. जॉन अब्राहम आणि सिनेमाचे निर्माते यशराज फिल्म्स यांनीही दीपिकासोबतचे हे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. मोशन पोस्टर शेअर करण्यासोबतच दीपिका पदुकोणचा सिनेमातील फर्स्ट लूकही समोर आला आहे.
अधिक वाचा- उभ्या असलेल्या बसनं दिली दुसऱ्या बसला धडक, 8 ठार; 35 हून अधिक जखमी
'पठाण'मधील दीपिकाचा लूक समोर
आता लोक या सिनेमाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. दरम्यान त्याच्या रिलीजला अद्याप 6 महिने बाकी असल्याच्या बातमीनं चाहते थोडे निराश झाले आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दीपिका पदुकोणने 'पठाण' सिनेमातील तिचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक गोळी बंदुकीतून बाहेर निघताना दिसत आहे. दीपिकाचा हा लूक लोकांना खूप आवडला आहे आणि लोक त्यावर खूप कमेंट करत आहेत. आतापर्यंत सुमारे अडीच लाख लोकांनी त्याला लाईक केलं आहे. दीपिकाचा हा लूक पाहून असे वाटते की, या सिनेमात ती एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे.
She’s ready to shoot it up a notch! Presenting @deepikapadukone in #Pathaan — Yash Raj Films (@yrf) July 25, 2022
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you on 25th January, 2023. Releasing in Hindi, Tamil and Telugu. #6MonthsToPathaan pic.twitter.com/Hr9woOSlvd
हे मोशन पोस्टर शेअर करताना यशराज फिल्म्सने लिहिलं आहे की, 'आता ती शूटिंगसाठी तयार आहे, पठाण सिनेमा दीपिका पदुकोणला सादर करत आहे.' याशिवाय यशराज फिल्म्सनं अशीही माहिती दिली की, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारीला हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
5 वर्षांनंतर शाहरुख खानचं रुपेरी पडद्यावर कमबॅक
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील 'पठाण' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाद्वारे शाहरुख खान 5 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. हा सिनेमा सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनवला जात आहे, जो 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाशिवाय शाहरुख खान 'डंकी' आणि 'जवान'मध्येही दिसणार आहे.
अधिक वाचा- खरंच?, 'ही' लस घेतली असेल तर Monkeypox धोका होतो कमी
'पठाण'नंतर दीपिका पदुकोण दिसणार 'प्रोजेक्ट के'मध्ये
बॉलीवूड न्यूजनुसार दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, पठाण व्यतिरिक्त तिच्या सिनेमांच्या यादीत इतर अनेक प्रोजेक्ट्स आहेत. पठाणनंतर दीपिका प्रभाससोबत 'प्रोजेक्ट के'मध्ये दिसणार आहे. या सिनेमानंतर ती रणवीर सिंगसोबत 'सर्कस' सिनेमात दिसणार आहे. मात्र, दीपिका या सिनेमात छोटी भूमिका साकारणार आहे. दीपिका पदुकोण शेवटची ओटीटीवर रिलीज झालेल्या 'घेराइयां' सिनेमात दिसली होती.