Grammy Awards 2023 Winners List: 'ग्रॅमी पुरस्कार' (Grammy Awards 2023) हा संगीतक्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. 65 व्या ग्रॅमी पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा सोमवारी म्हणजेच 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. हा पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमध्ये पार पडला असून 'ग्रॅमी पुरस्कार' वर प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेनं (Beyonce) आपलं नाव कोरलं. बियॉन्सेनं या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आपल्या करिअरमधील 32 वा ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला. यासोबतच भारतीय वंशाचा फेम रिकी केजनेही पुन्हा एकदा ग्रॅमी अवॉर्ड जिंकले आहे. 2023 वर्षाचा ग्रॅमी पुरस्कार कोणी-कोणी जिंकला याची माहिती आपण जाणून घेऊन.
अधिक वाचा : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी
ग्रॅमी अवॉर्ड्स 2023मध्ये जर कोणत्या पॉप सिंगरचा जलवा दिसला.बियॉन्से नॉलसेने तिच्या करिअरमध्ये 32 व्या वेळी ग्रॅमी अवॉर्ड्स जिंकून इतिहास रचला.बियॉन्से नॉलेसला बेस्ट डान्स/इलेक्ट्रोनिक म्युझिक अल्बम कॅटेगरीमध्ये रेनेसेन्ससाठी विजेती म्हणून निवडण्यात आले. याऐवजी बेस्ट डान्स/इलेक्ट्रोनिक रिकॉर्डिंगमध्ये ब्रेक माय सोल साठी इलेक्ट्रोनिक बियॉन्से नॉलेसला ग्रॅमी पुरस्कार मिळाला. याशिवाय बियॉन्सेने यंदाच्या ग्रॅमीमध्ये सर्वोत्कृष्ट आर एंड बी गाण्याच्या कॅटेगरीमध्येही पुरस्कार विजेती ठरली आहे.
भारतीय वंशाचा फेमस संगीतकार रिकी केजसाठी ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 खूपच विशेष आहे. रिकी केजने या वेळेच्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये प्रसिद्ध ब्रिटीश रॉक बँड द पोलीसचे ड्रमर स्टीवर्ट कोपलँड यांनी हे शीर्षक शेअर केले आहे. रिकी रेज आणि कोपलँड यांनी सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी अवॉर्ड जिंकले आहेत. रिकी केजने त्याच्या करिअरमध्ये तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे.
अधिक वाचा : लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?
द कॉलिंग - काबाका पिरॅमिडने ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 साठी सर्वोत्कृष्ट रॅगी अल्बम श्रेणीमध्ये हे विशेष पुरस्कार जिंकले आहेत.
65 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अमेरिकन रूट्स गाण्याच्या श्रेणीमध्ये जस्ट लाइक दॅटसाठी बूनी रॅटची विजेता म्हणून निवड करण्यात आली.
वॉली नेल्सनला ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 मध्ये लिव्ह फॉरएव्हरसाठी सर्वोत्कृष्ट कंट्री सोलो परफॉर्मन्स श्रेणीमध्ये विजेते म्हणून निवडण्यात आले.