हिमेश रेशमियाला थोबाडीत मारायचं होतं आशा भोसलेंना, जाणून घ्या हिमेशबद्दल FACTS

कला संगीत
Updated Jul 23, 2019 | 13:28 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Happy Birthday Himesh: हिमेश रेशमिया आज २३ जुलैला आपला वाढदिवस साजरा करतोय. हिमेश त्याच्या आयुष्यात अनेक वादांमध्ये सापडलाय. यात सलमान सोबतचं भांडण असो किंवा आशा भोसलेंसोबतचा वाद. जाणून घ्या हिमेशबद्दल...

Himesh Reshamiya and Aasha Bhosle
आशा भोसलेंना मारायचं होतं हिमेशच्या थोबाडित 

थोडं पण कामाचं

  • हिमेश रेशमियाचा २३ जुलैला वाढदिवस
  • आर डी बर्मनवरील कमेंटनंतर आशा भोसले हिमेशवर चिडल्या
  • गॉडफादर असलेल्या सलमान खान सोबतही झालं होतं हिमेशचं भांडण

मुंबई: 'झलक दिखला जा', 'तेरा तेरा सुरूर', 'आशिक बनाया' आणि 'बस एक बार' सारख्या गाण्यांनी तरुणांच्या मनावर आपला ठसा उमटवणारा गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया आज आपला वाढदिवस साजरा करतोय. हिमेश रेशमियाचे वडील विपिन रेशमिया हे सुद्धा संगीतकार होते. हिमेश रेशमिया सलमान खानला बॉलिवूड इंडस्ट्रीमधील आपला गॉडफादर मानतो.

हिमेश रेशमियानं सलमान खानचा चित्रपट ‘प्यार किया तो डरना क्या’ द्वारे संगीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्यानं सलमानच्याच दुल्हन हम ले जाएंगे, जलवा आणि तेरे नाम या चित्रपटांनाही संगीत दिलं. हिमेश रेशमिया संगीतकार म्हणून यशस्वी ठरला आहेच. त्याचबरोबर गायक म्हणूनही त्याचे अनेक गाणे हिट ठरले आहेत. २००५ साली आलेल्या आशिक बनाया आपने चित्रपटाचं टायटल साँग गाऊन त्यानं गायक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.

हिमेश रेशमियाचं नाव अनेक वादविवादांसोबत जोडलं गेलंय. हिमेशनं आपला गॉडफादर असलेल्या सलमान खान सोबत भांडण केलं होतं. त्या भांडणाचा परिणाम असा झाला की, हिमेशला अनेक चित्रपटांमधून काढून टाकलं गेलं. सलमान सोबतच्या भांडणाचा खूप मोठा भुर्दंड त्याला भरावा लागला.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Love you bhai!

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

 

आशा भोसलेंना हिमेशच्या थोबाडीत मारायचं होतं

हिमेश रेशमिया आणि आशा भोसले यांच्या दरम्यान पण मोठा वाद झाला होता. हिमेशनं आपल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, हाय पिच गाणं म्हणतांना आवाजात नेजल व्हॉईस टच येतो. यासाठी त्यानं बॉलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार आर. डी. बर्मन यांचं उदाहरण दिलं होतं.

हिमेश रेशमियाची ही कमेंट आर डी बर्मन यांची पत्नी असलेल्या आशा भोसलेंना आवडली नाही. आशाताईंनी म्हटलं होतं की, अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्याच्या थोबाडीत मारलं पाहिजे. यानंतर आशा भोसले आणि हिमेश रेशमिया एकत्र सिंगिग रिअॅलिटी शो सा रे गा मा पा मध्ये जज म्हणून होते. पण तरीही दोघांमधील वाद संपला नव्हता.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Had another show at Kolkata last night, amazing crowd, historic experience! Cheers, love you all

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

 

पहिल्या पत्नीसोबत घेतला घटस्फोट

हिमेश रेशमियानं वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी कोमल रेशमियासोबत लग्न केलं होतं. हिमेशनं २०१७ साली आपली पहिली पत्नी कोमल सोबत घटस्फोट घेतला. हिमेश आणि कोमल यांना एक मुलगा स्वयम आहे. त्यानंतर हिमेशनं २०१८ साली टिव्ही अभिनेत्री सोनिया कपूर सोबत दुसरा विवाह केला.

 

 

लग्नापूर्वी हिमेश आणि सोनिया जवळपास ८ वर्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिले. वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर हिमेश रेशमिया चित्रपट ‘मैं जहां रहूं’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०२० साली रिलीज होणार आहे. याशिवाय हिमेशनं इंडियन आर्मी सोल्जर, बिष्णू श्रेष्ठ यांच्या बायोपिकचे राईट्स विकत घेतले आहेत.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
हिमेश रेशमियाला थोबाडीत मारायचं होतं आशा भोसलेंना, जाणून घ्या हिमेशबद्दल FACTS Description: Happy Birthday Himesh: हिमेश रेशमिया आज २३ जुलैला आपला वाढदिवस साजरा करतोय. हिमेश त्याच्या आयुष्यात अनेक वादांमध्ये सापडलाय. यात सलमान सोबतचं भांडण असो किंवा आशा भोसलेंसोबतचा वाद. जाणून घ्या हिमेशबद्दल...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...