Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचं 'शिवतांडव स्तोत्र' रिलीज, काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज

Maha Shivratri Special 2022, Amruta Fadnavis Shiv Tandav Stotram : अमृता फडणवीस त्यांनी गायलेल्या शिव तांडव (शिवतांडव) स्त्रोत्रामुळे चर्चेत आहेत. 

Maha Shivratri Special 2022, Amruta Fadnavis Shiv Tandav Stotram
अमृता फडणवीसांचं 'शिवतांडव स्तोत्र' रिलीज 
थोडं पण कामाचं
  • अमृता फडणवीसांचं 'शिवतांडव स्तोत्र' रिलीज
  • काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज
  • सोशल मीडियावर चर्चा

Maha Shivratri Special 2022, Amruta Fadnavis Shiv Tandav Stotram : मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात. कधी वक्तव्य अथवा मतप्रदर्शनाच्या निमित्ताने तर कधी त्यांनी गायलेल्या गाण्यांमुळे त्या चर्चेत असतात. आता पण अमृता फडणवीस त्यांनी गायलेल्या शिव तांडव (शिवतांडव) स्त्रोत्रामुळे चर्चेत आहेत. 

टाइम्स म्युझिकसाठी अमृता फडणवीस यांनी शिव तांडव (शिवतांडव) स्त्रोत्र गायले आहे. या शिव तांडव (शिवतांडव) स्त्रोत्राचा व्हिडीओ यूट्युबवर प्रदर्शित झाला आहे. हा व्हिडीओ प्रदर्शित झाल्यावर काही तासांतच त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांनी हा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. शैलेश दानी या व्हिडीओचे संगीत दिग्दर्शक आहेत. 

याआधी अमृता फडणवीस यांनी गणेशोत्सवात एक गाणे प्रदर्शित केले होते. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील नद्यांवरही एक गाणे केले होते. 'तिला जगू द्या' हे मुलींच्या संदर्भातले त्यांचे गाणेही आधी लोकप्रिय झाले होते. 

अमृता फडणवीस काही दिवसांपूर्वीच झी मराठी या टीव्ही चॅनलच्या 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी इतर पाहुण्या कलाकरांसह धमाल केली होती. 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांना पुरणपोळी हा पदार्थ आवडतो आणि एका पंगतीत ३०-३५ पुरणपोळ्या ते सहज खातात असे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. नंतर सोशल मीडियावर या मुद्यावरून भरपूर चर्चा झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी