marathi new movie : मराठी भाषा ही जगली जाते. प्रत्येक माणसाचा अभिमान आहे मराठी भाषा. दर दहा पावलांवर मराठी भाषेचे रुप बदलले जाते. तीची बोलण्याची पध्दत बदलते. त्या त्या भागातल्या संस्कृतीच्या खुणा त्यात दिसून येतात. तर काही ठिकाणी तिची बोलायची चाल बदलते. काही वळणावर ही माय मराठी मृदू भासते तर कुठे ती कणखर, खट्याळ होऊन हसवते तर काही ठिकाणी खोचकही होतेच. ‘महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट 27 फेब्रुवारीला चित्रपटातील गाण रिलीज झाले.
‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. रिलीजच्या आधीच हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. काल मराठी भाषादिनी चा चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास…’हे गाणेही वैशिष्ट्य अधोरेखित करणार आहे.
अधिक वाचा : या हेल्दी फूडने हृदय राहील टणाटण
एकीकडे पांढरपेशा सवर्ण समाजातील रेखीव मराठी म्हणजे भानूमती, म्हणजेच शाहिरांची सुविद्य पत्नी, कवयित्री भानुमती. तर दुसरीकडे कृष्णाकाठच्या सातारी मातीत रुजलेली रांगडी मराठी म्हणजे कृष्णा म्हणजेच कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात आपले शाहीर साबळे. मराठी भाषेतले दोन विरोधी रंग या नव्या प्रेमगीताच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. मराठी भाषा दिनाचे निमित्त साधून तयार झालेल हे गाणं म्हणजे १९४२ सालच्या रंगात रंगलेले आणि २०२३ सालच्या तरुणाईला भावलेले एक अस्सल मराठी प्रेमगीत आहे.
अधिक वाचा : Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय
हे गाणं गुरु ठाकूर यांनी लिहिल आहे तर अजय गोगावले व श्रेया घोषाल यांनी गायले आहे. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला आणि गाण्याला संगीत दिले आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे!
हे गाणं प्रेमगीतावर आधारित आहे. या गाण्यामध्ये शाहीर साबळे आणि त्यांच्या पत्नी भानुमती यांच्या प्रेमाची कथा दाखवली आहे. शाहीर म्हणजे माझे आजोबा हा अस्सल सातारी रांगडा गडी तर माझी आजी ही शहरी पार्श्वभूमी असलेली एक सुविध्य तरुणी. कलेच्या एका धाग्याने दोघेही एकत्र आलेले आणि जणू एकमेकांसाठीच जन्मलेले. ‘बहरला हा मधुमास…’मधून त्यांच्या प्रेमकथेचा जणू एक आगळा आविष्कारच समोर येतो. गीतकार आणि संगीतकारांनी या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे,” असे उद्गार चित्रपटाचा दिग्दर्शक केदार शिंदे याने काढले.