योगेश सोमण सक्तीच्या रजेवर, ही असहिष्णुता नाही का ?भाजप नेते आशिष शेलारांचा सवाल

गेल्या महिनाभरापासून मुंबई विद्यापीठात अभिनेते योगेश सोमण याच्या बाबतीत जे घडते आहे.त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेणे, या सगळ्या गोष्टी आता असहिष्णुतेत बसत नाहीत का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला

yogesh Soman
योगेश सोमण सक्तीच्या रजेवर, ही असहिष्णुता नाही का ?भाजप नेते आशिष शेलारांचा सवाल  |  फोटो सौजन्य: Facebook

गेल्या महिनाभरापासून मुंबई विद्यापीठात अभिनेते योगेश सोमण याच्या बाबतीत जे घडते आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेणे, या सगळ्या गोष्टी आता असहिष्णुतेत बसत नाहीत का? असा सवाल भाजप नेते आणि माजी शिक्षणमंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी केला आहे. तसंच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांना हाताशी धरून समाजात आणि शैक्षणिक संस्थेत असंतोष माजवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर घेऊन जाण्याचे  प्रकारचं होत आहेत, असंही शेलार म्हणाले आहेत.  स्वातंत्रवीर सावरकर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधाने सोयीस्करपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाने खपवून घ्यावी का?  जर मुंबई विद्यापीठाच्या अँकडमी आँफ थिएटर आर्टचे संचालक योगेश सोमण यांनी त्याबाबतीत परखड उत्तरे दिली म्हणून कॉग्रेसच्या विद्यार्थी दलाचे नेते मुंबई विद्यापीठाला वेठीस धरून यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात,  पोलिसांकडे जाऊन  सोमण यांच्या विरोधात गांधी कुटुंबाचा घोर अपमान झाला म्हणून तक्रार करतात मग ही कॉंंग्रेस ची असहिष्णुता नाही का? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे.

काल थिएटर आर्ट च्या शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवला जातं नाही, असे मुद्दे काढून अकादमीच्या ठराविक विचारधारा असलेल्या  मुलांना हाताशी धरून पुन्हा एकदा योगेश  सोमण यांच्या विरोधात काही राजकीय व्यक्तिनी मुंबई विद्यापीठात गोंधळ घातला. सोमण यांचा सक्तीचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी दबाव टाकला. विद्यापीठाने दबावाला बळी पडून सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. 

त्यामुळे योगेश सोमण यांच्यावर झालेल्या अन्यायावर मुंबई विद्यापीठाने समिती नेमून थिएटर अकादमीची गेल्या पाच वर्षाची सखोल चौकशी व्हावी. म्हणजे सत्य काय आहे ते विद्यार्थाना कळेल. स्वत:चे राजकीय बस्तान बसावे आणि त्यासाठी अभिव्यक्तीच्या नावाने बेताल वक्तव्य करावं आणि त्याला प्रतित्तुर आल्यावर हेच लोक आंदोलन करणार ही असहिष्णुता नाही का? असा सवाल आमदार अँड. आशिष शेलार यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी