टाइम्स म्युझिकचे गणेशोत्सवाची भेट अमृता फडणवीस याचं ‘गणेश वंदना’

टाइम्स म्यूझिक सादर करत आहेत अमृता फडणवीस ह्यांचं ‘गणेश वंदना’ आणि जोनिता गांधी ह्यांचं ‘गणेशाय धीमही’ ही गाणी, खास गणेश चतुर्थीच्या उत्सवासाठी.

Times Music presents  “Ganesh Vandana” by the amazing Amurta Fadnavis and “Ganeshay Dheemahi” by Jonita Gandhi, just in for Ganesh Chaturthi celebrations of 2021
अमृता फडणवीस याचं ‘गणेश वंदना’ गणेश चतुर्थीला 
थोडं पण कामाचं
  • गणेश चतुर्थी 2021 च्या शुभमुहुर्तावर टाइम्स म्युझिकची भेट
  • अमृता फडणवीस ह्यांच्या ‘गणेश वंदना’मध्ये ‘ओम गण गणपतेय’ आणि ‘मोरया रे’ एकत्र आले आहेत. 
  • हे दोन्ही अत्यंत लोकप्रिय मंत्र असून गणपत्ती बाप्पांच्या आराधनेसाठी वापरले जातात.

मुंबई : अमृता फडणवीस ह्यांच्या ‘गणेश वंदना’मध्ये ‘ओम गण गणपतेय’ आणि ‘मोरया रे’ एकत्र आले आहेत. 
हे दोन्ही अत्यंत लोकप्रिय मंत्र असून गणपत्ती बाप्पांच्या आराधनेसाठी वापरले जातात. अमृता फडणवीस ह्यांच्या सुरांनी ह्या गाण्यात जादू केली असून पाहाताना डोळ्यांचीही पारणे फिटतात. विजय दयाल ह्यांनी संगीतबध्द केलेली ‘गणेश वंदना’ ह्या वर्षी गणेशोत्सवात घरात असायलाच हवी. (Times Music presents  “Ganesh Vandana” by the amazing Amurta Fadnavis and “Ganeshay Dheemahi” by Jonita Gandhi, just in for Ganesh Chaturthi celebrations of 2021 )

ह्याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘‘यंदा गणेश चतुर्थीला ‘गणेश वंदना’ गाताना मला खूप आनंद झाला. ‘ओम गण गणपतेय’ मंत्र आणि ‘मोरया रे’ धून ऐकताना अतिशय शांत वाटतं. ही रचना अत्यंत सुंदरपणे संगीतबध्द आणि चित्रित झाली आहे आणि प्रत्येकाने ह्या गाण्यांचा आस्वाद घ्यावा असं मला वाटतं. रसिक ह्या गाण्यांना भरभरून प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे.’’

जोनिता गांधी म्हणाल्या, ‘‘श्री गणेशाय धीमही’’ हे कायम लक्षात राहाणारे भक्तिगीत आहे आणि ते गाताना मी मंत्रमुग्ध होऊन गेले! शैलेश दाणींनी ह्या गाण्याची निर्मिती करताना आपली सर्जनशीलता पणाला लावली आहे. शिवाय ह्यात दोन नवीन श्लोक असून ऑफिशियल फीमेल वर्जन गायल्यामुळे मला खूप समाधान मिळालं आहे! ओरिजनल गाणं शंकर महादेवनजींनी गायलं होतं आणि हे भक्तिगीत गाताना मला त्यातून प्रेरणा मिळाली. मला आशा आहे की मला गाताना जितका आनंद झाला तितकाच आनंद रसिकांनाही मिळेल.’’

टाइम्स म्यूझिक ह्यासोबत #HarGharGanpati कार्यक्रमा अंतर्गत 14 नवीन व्हिडिओही सादर करत आहे. ज्यामुळे गणेश चतुर्थी 2021 साजरी करायचं लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि ते घरात राहून भक्तिरसात दंग होतील.

‘गणेश वंदना’ आणि ‘गणेशाय धीमही’ हे टाइम्स म्यूझिकचं खास सादरीकरण आहे आणि टाइम्स म्यूझिकच्या अध्यात्मिक यू ट्यूब चॅनलवर ऐकता व पाहाता येईल. तसेच सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे.

यू ट्यूबवर पहा:
जोनिता गांधींचं गणेशाय धीमही: https://www.youtube.com/watch?v=yVsmF9qSt_U  
अमृता फडणवीस ह्यांची गणेश वंदना: https://youtu.be/5Kpq-PosJdQ
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी