टाइम्स म्यूझिकची खास दिवाळी भेट, श्रेया घोषाल, शंकर महादेवन, हेमा मालिनी, ईशा देओल यांची मेजवानी

कला संगीत
Updated Nov 12, 2020 | 16:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

टाइम्स म्यूझिकने त्यांच्या दिवाळी बोनान्झाचा भाग असलेली ‘संपूर्ण दिवाळी आरती’ प्रेक्षकांसाठी आणली आहे. यात प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल, शंकर महादेवन, हेमा मालिनी आणि ईशा देओल दिसणार आहेत.

Times Music Diwali Bonanza
टाइम्स म्यूझिकची खास दिवाळी भेट, श्रेया घोषाल, शंकर महादेवन, हेमा मालिनी, ईशा देओल यांची मेजवानी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तम गाण्यांचा संग्रह आहे ‘संपूर्ण दिवाळी आरती’
  • काय म्हणत आहेत यातले गायक-सादरकर्ते?
  • कुठे पाहाल आणि ऐकाल ‘संपूर्ण दिवाळी आरती’?

टाइम्स म्यूझिकने (Times Music) त्यांच्या दिवाळी बोनान्झाचा (Diwali Bonanza) भाग असलेली ‘संपूर्ण दिवाळी आरती’ (Sampoorna Diwali Aarti) प्रेक्षकांसाठी आणली आहे. यात प्रसिद्ध पार्श्वगायिका (renowned playback singer) श्रेया घोषाल (Shreya Ghoshal), शंकर महादेवन (Shankar Mahadevan), हेमा मालिनी (Hema Malini) आणि ईशा देओल (Esha Deol) दिसणार आहेत. चार व्हिडिओच्या या संचात (video collection) दिवाळीच्या खास आरत्या (special Aarti), श्लोक (Shlokas), स्त्रोत्रे (Stotra) आणि लक्ष्मीपूजेचा विधी (method of Lakshmi Pooja) असणार आहे. यंदाची दिवाळी (Diwali) घरच्या घरी धूमधडाक्यात आणि विधिवत साजरी करण्यासाठी हे पॅकेज अतिशय उत्तम आहे.

उत्तम गाण्यांचा संग्रह आहे ‘संपूर्ण दिवाळी आरती’

‘संपूर्ण दिवाळी आरती’ हा प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिने गायलेल्या निवडक मधुर गाण्यांचा संग्रह आहे. श्रेयस पुराणिक हिने या गाण्यांना संगीत दिले आहे. शंकर महादेवन यांनी गायलेल्या ‘दीपदानम’ या गीत शैलेश दाणी यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केलेले ‘लक्ष्मी अष्टकम’ हे सादरीकरणही यात असून याला अंजली दयाल यांचे संगीत लाभले आहे. तर ईशा देओलने आपल्या अनोख्या शैलीत ‘लक्ष्मीपूजन विधी’ सादर केला असून यात पूजाविधीचे टप्प्याटप्प्याने केलेले मार्गदर्शन आहे.

काय म्हणत आहेत यातले गायक-सादरकर्ते?

पार्श्वगायिका श्रेया घोषालने याविषयी म्हटले आहे, ‘दिवाळी हा अत्यंत उत्साहाचा सण आहे आणि जेव्हा मला ‘संपूर्ण दिवाळी आरती’मध्ये गाण्याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा मी प्रचंड उत्सुक होते. या संग्रहात अतिशय सुंदर आरत्या आहेत ज्या आपण कधीही ऐकू शकता, मात्र दिवाळीचे दिवस या आरत्यांनी नक्कीच अधिक चांगले होतील.’

शंकर महादेवन यांनी याविषयी बोलताना म्हटले, ‘दीपदानममधून ज्ञानाचे महत्व अधोरेखित होते, दुष्ट प्रवृत्तींवर सत्याचा विजय साजरा होतो. ज्या काळात आपण सध्या राहात आहोत त्यात याचे महत्व अतिशय वाढते. यामुळे सर्व श्रोत्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आशा येईल अशी मी आशा करतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.’

तर हेमा मालिनी म्हणाल्या, ‘लक्ष्मी अष्टकम हे एक पवित्र आणि माझ्या हृदयाच्या खूप जवळ असलेले स्तोत्र आहे. मी या गीतावर आणि त्याच्या निर्मितीवर खूप खुश आहे. यामुळे सर्व श्रोत्यांना नेहमीच आणि खासकरून दिवाळीत आनंद मिळेल अशी मी आशा करते.’

ईशा देओलने म्हटले आहे, ‘टाईम्स म्यूझिकसाठी लक्ष्मीपूजन सादर करणे हा अतिशय आनंददायक अनुभव होता. दिवाळी हा खूप सुंदर आणि तेजस्वी सण आहे आणि आपण तो धूमधडाक्यात साजरा करतो. यावर्षी आणि यापुढे नेहमीच लोक माझ्यासोबत ही लक्ष्मीपूजा मार्गदर्शनाखाली करू शकतील याचा मला आनंद आहे. मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि ही दिवाळी घरची आणि सुरक्षित जावो अशी सदिच्छा देते.’

कुठे पाहाल आणि ऐकाल ‘संपूर्ण दिवाळी आरती’?

टाइम्स म्यूझिकचा हा अल्बम ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. टाइम्स म्यूझिक स्पिरिचुअल यूट्यूब चॅनेलवर हा अल्बम प्रेक्षकांना ऐकता येणार आहे.       

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी