टाइम्स म्युझिकचा Exclusive पार्टनर स्पीड रेकॉर्ड्सचे YouTube वर 40 दशलक्ष सब्स्क्राइबर, ठरला पहिला पंजाबी संगीत लेबल 

टाइम्स म्युझिक आणि स्पीड रेकॉर्ड्सची पार्टनशीप खूप यशस्वी झाली आहे आणि स्पीड रेकॉर्ड्स हा अलीकडीलच YouTube वर 40 दशलक्ष सब्स्क्राइबर मिळविणारा पहिला पंजाबी संगीत लेबल ठरला आहे

Times Music's exclusive partner Speed Records emerges as the first Punjabi music label to hit 40 Million subscribers on YouTube
टाइम्स म्युझिकचा पार्टनर स्पीड रेकॉर्ड्स YouTubeवर उड्डाण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टाइम्स म्युझिक आणि स्पीड रेकॉर्ड्सची पार्टनशीप खूप यशस्वी झाली आहे
  • स्पीड रेकॉर्ड्स हा अलीकडीलच YouTube वर 40 दशलक्ष सब्स्क्राइबर मिळविणारा पहिला पंजाबी संगीत लेबल ठरला आहे.
  • या पार्टनरशीपनंतर, केवळ 4.5 वर्षांत, YouTube वर स्पीडचे सदस्य 10 पटीने वाढले,

मुंबई :  टाइम्स म्युझिक आणि स्पीड रेकॉर्ड्सची पार्टनशीप खूप यशस्वी झाली आहे आणि स्पीड रेकॉर्ड्स हा अलीकडीलच YouTube वर 40 दशलक्ष सब्स्क्राइबर मिळविणारा पहिला पंजाबी संगीत लेबल ठरला आहे. या पार्टनरशीपनंतर, केवळ 4.5 वर्षांत, YouTube वर स्पीडचे सदस्य 10 पटीने वाढले, जे 2017 मध्ये 4.5 दशलक्ष होते ते 2022 मध्ये 40 दशलक्ष झाले! (Times Music's exclusive partner Speed Records emerges as the first Punjabi music label to hit 40 Million subscribers on YouTube )

स्पीड रेकॉर्ड्सचे संचालक सतविंदर सिंग कोहली म्हणाले, "स्पीड रेकॉर्ड्स आणि टाइम्स म्युझिक प्रकल्पांवर खूप समर्पित भावनेने काम करत आहेत आणि आम्ही गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय हिट्स देत आहोत. टाइम्स म्युझिक Exclusive भागीदार असल्याने आमच्यासाठी खूप फलदायी ठरले आणि परिणाम स्वतःच बोलतो. YouTube वर 40 दशलक्ष सदस्यांसह, आम्ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोच्च पंजाबी संगीत रेकॉर्ड लेबल आहोत."

TmSpeedHorizontal

या यशाबद्दल आनंदी, टाईम्स म्युझिकचे सीओओ मंदार ठाकूर म्हणाले, "हा टप्पा गाठण्यासाठी संपूर्ण टीमने खूप परिश्रम घेतले आहेत आणि त्यांच्या अद्भूत योगदानाबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. हा प्रवास उत्साहवर्धक होता आणि गेल्या काही वर्षांमध्ये हे सहकार्य भरभराटीला आले आहे. उत्कृष्ट परिणाम मिळाले आहेत. आमच्या प्रेक्षकांना दर्जेदार कन्टेन्ट ऑफर करण्याच्या आमच्या सहयोगी समर्पणाने मी भविष्यात अधिक दर्जा वाढवण्याची कल्पना करू शकतो."

Speed ​​Records कडे इंडस्ट्रीतील अत्यंत प्रतिभावान कलाकारांसह जागतिक दर्जाचे पंजाबी संगीताचे विविध प्रकार आहेत आणि या वर्षासाठीही काही अतिशय मनोरंजक रिलीझ आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी