मुंबई: Neha Kakkar Tony Kakkar Song Bheegi Bheegi Video: अभिनेत्री नेहा कक्कड़ लॉकडाउनमध्येही आपल्या चाहत्यांना निराश करत नाही. कारणं तिचं नवीन गाणं भीगी-भीगी रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं नेहा व तिचा भाऊ टोनी कक्कर यांनी गायलं आहे. टोनी कक्कड़ आणि नेहा कक्कड यांचं हे गाणं चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे.
हा रोमँटिक व्हिडिओ काही तासात ३३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या नवीन म्युझिक व्हिडिओसाठी गाणं प्रिन्स दुबे याच्यासह नेहाचा भाऊ टोनी कक्कड़ यांनी लिहिले आहेत. ३.२२ मिनिटांच्या या रोमँटिक गाण्याचे शूटही टोनी आणि नेहावर झाले आहे.