[VIDEO] सपना चौधरीला जोरदार टक्कर देतीय ही नवी डान्सर

कला संगीत
Updated Jan 17, 2021 | 20:32 IST

Haryanvi Singer Komal Rangili: डान्सर सपना चौधरी डान्सर कोमल रंगीली हिने जोरदार टक्कर दिली आहे. लग्न आणि प्रेग्नन्सी दरम्यान सपना चौधरी काही काळ आपल्या डान्सपासून दूर होती. त्याचवेळी कोमलचे फॉलोअर्स मात्र वाढले

थोडं पण कामाचं
  • डान्सर कोमल रंगीलीने दिली सपना चौधरीला टक्कर
  • तिचे पूर्ण नाव कोमल रंगीली फतेहपूर आहे
  • कोमलच्या डान्स व्हिडिओंना युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळत आहेत

मुंबई: Who is Komal Rangili: हरियाणवी डान्सर सपना चौधरीला आता  डान्सर कोमल रंगीलीने सोशल मीडियावर जोरदार टक्कर दिली आहे. लग्नाच्या आणि प्रेग्नन्सी दरम्यान सपना चौधरी नृत्यापासून दूर राहिल्यामुळे कोमलचे फॉलोअर्स वाढले. सपना चौधरी ही तिच्या डान्सच्या जोरावर लाखोंची पहिली पसंती आहे. मात्र असं असलं तरीही कोमल रंगीली हिचा देखील बोलबाला वाढला आहे.

तिचे पूर्ण नाव कोमल रंगीली फतेहपूर असे आहे. चित्रपट गीतांसह भोजपुरी आणि हरियाणवी गाण्यांवर नाचणारी ती एक डान्सर आहे. कोमल रंगीली ही यूट्यूबवर एक हॉट डान्सर मानली जाते. सपना चौधरी प्रमाणे कोमल रंगीलीच्या यूट्यूब व्हिडिओंनाही लाखो व्ह्यूज मिळतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी