मुंबई: Sapna Choudhary Live Dance Performance: हरियाणवी डान्सर सपना चौधरी आता जहानाबाद (बिहार) मध्येही तिच्या नृत्याची जादू दाखवत आहे. तिच्या अदा पाहण्यासाठी जहानाबादमध्ये मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली होती. तर त्याच वेळी सपना चौधरीचे चाहतेही तिच्यासोबत थिरकताना दिसले.
विशेष म्हणजे सपना चौधरीसह चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री आम्रपाली दुबेही अनेक गाण्यांवर थिरकताना दिसली. जहानाबादमधील परफॉर्मन्स दरम्यान सपना चौधरीने हिरवा रंगाचा सूट परिधान केला होता तर आम्रपाली दुबेने निळा रंगाचा सूट परिधान केला होता. त्यामध्ये दोघेही नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होते.