या गाण्याने रचला इतिहास, यूट्यूबवर तब्बल ७०१ कोटी व्ह्यूज 

कला संगीत
Updated Oct 19, 2020 | 20:08 IST

लुईस फॉन्सी आणि डॅडी याँकी यांचं एक गाणं खूपच व्हायरल झालं आहे. या गाण्याला आतपर्यंत तब्बल ७०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

मुंबई: संगीत हे काही ठराविक भाषेमध्येच असतं असं नाही. गाणं कोणत्याही भाषेमध्ये असो चाहते ते ऐकतातच. याच गोष्टीचं Despacito हे एक जिवंत उदाहरण आहे.  हे स्पॅनिश गाणे सध्या यूट्यूबवर जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे. आतापर्यंत त्याला 7 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. 

लुईस फोन्सी आणि डॅडी याँकी याने गायिलेलं हे 'डेस्पासिटो' हे गाणं सन २०१७ मध्ये रिलीज करण्यात आलं होतं. या गाण्याने अमेरिकेच्या टॉप हंड्रेड हॉट गाण्यांच्या यादीतही आपले स्थान बनवले आहे. हे स्पॅनिश भाषेतील रॅप गाणे आहे. परंतु त्याचे संगीत इतके उत्कृष्ट आणि आकर्षक आहे की जगभरातील लोकांना या गाण्यावर नाचण्यास भाग पाडले जाते. 

अनेक जण हे या गाण्यासह स्टेप्स करत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत आहे. आपल्याला लक्षात असेल की, यापूर्वी दक्षिण कोरियाचे गाणे 'गंगनम स्टाईल' देखील अशाच प्रकारे प्रसिद्ध झाले होते. लुईस फोन्सी आणि डॅडी यांकी हे दोघेही अमेरिकेतील पॉर्ट रिकोमधील गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी