[VIDEO] 'या' गाण्याला एका दिवसात २० लाखाहून अधिक व्ह्यूज

कला संगीत
Updated Jan 18, 2021 | 18:47 IST

पंजाबी गायक जिगर याचं इंटरनेटवर एक गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात निकिता ढिल्लनचा जबरदस्त लूक देखील पाहायला मिळाला आहे. त्यांच्या या गाण्याला आतापर्यंत २० लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

मुंबई: जिगर हा पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमधील  गायक आहे. तसेच जिगर जबरदस्त एक अभिनेता देखील आहे. अलीकडे जिगरचे नवीन गाणं 'हवा आन दे' इंटरनेटवर रिलीज केलं आहे. त्याच्या या गाण्याने यूट्यूबवर एकच धुमाकूळ घातला आहे. जिगर  हा निकिता ढिल्लनच्या सौंदर्याने अक्षरश: घायाळ होतो. या गाण्यात जिगरची स्टाईल पाहून निकिता देखील जिगरच्या प्रेमात पडते. हे गाणे मजेदार पद्धतीने चित्रित केले गेले आहे.

गाण्यात निकित खूपच सुंदर दिसत आहे. जिगरची स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्याचबरोबर त्यांच्या गाण्याला एका दिवसात २० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ज्यावरुन आपल्याला या गाण्याच्या लोकप्रियतेविषयी अंदाज लावता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी