[VIDEO] 'भाबी' हे नवीन गाणं झालं रिलीज

कला संगीत
Updated Jan 04, 2021 | 19:56 IST

Kamal Khera Punjabi Song: कमल खैरा यांचे नवीन गाणे 'भाबी' यूट्यूबवर रिलीज झाले आहे. पाहा हे नवीन गाणं. 

मुबंई: कमल खैरा हे पंजाबी संगीत इंडस्ट्रीमधील अशा काही गायकांपैकी एक आहे ज्यांची लोकप्रियता केवळ पंजाब, हरियाणा इतकीच मर्यादित नाही तर त्यांची गाणी भारतातील इतर राज्यातही खूप लोकप्रिय आहेत.

कमल खैराची गाणी इंटरनेटवर रिलीज होताच व्हायरल होतात. अलीकडे, काही तासांपूर्वी कमल खैरा यांचे नवीन गाणं 'भाबी' हे यूट्यूबवर रिलीज झाले आहे. या गाण्यात कमल खैरा एका मुलीच्या प्रेमात पडला आहे.

या गाण्याला काही तासांत ८० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमल खैरा यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणं जस्सी लोहका यांनी लिहलं आहे. तर संगीत गुर सिद्धू यांनी दिले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी