[VIDEO] Ladki Dramebaaz Hai र‍िलीज, पाहा हा भन्नाट डान्स

कला संगीत
Updated Nov 11, 2020 | 21:25 IST

‘सूरज पे मंगल भारी’ या सिनेमातील लडकी ड्रामेबाज रिलीज झालं आहे. या डान्स ट्रॅकमध्ये दिलजित-फातिमाची केमिस्ट्री पाहता येणार आहे. 

मुंबई: सूरज पे मंगल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी या चित्रपटाचे नवीन गाणं 'लडकी ड्रामेबाज है' रिलीज झाले आहे. हा एक डान्स ट्रॅक आहे ज्यामध्ये आपल्याला फातिमाच्या रंगीबेरंगी व्यक्तिमत्त्वाची झलक मिळेल आणि तिची दिलजितबरोबरची मैत्रीपूर्ण आणि प्रयत्नशील केमिस्ट्री दिसेल. 

यापूर्वी हे दोघेही ‘वारेया’ या रोमँटिक गाण्यातही दिसले होते. या गाण्याला जावेद-मोहसीन यांनी संगीत दिले आहे. ज्यांनी पूर्वी जलेबी चित्रपटातील मुन्ना मायकेलची डिंग डांग आणि जलेबी से पल यासारखी गाणी सादर केली आहेत. ही गाणी यूट्यूबवर खूपच सुपर हिट आहेत. पाहा सूरज पे मंगल भारी हा चित्रपटातील खास गाण्याचा व्हिडिओ.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी