मुंबई: सुप्रसिद्ध हरियाणवी गायिका रुचिका जांगिड हिचं नवीन गाणं 'पटोले बरगी' यूट्यूबवर प्रचंड पाहिलं जात आहे. ६ जानेवारीला रिलीज झालेल्या या हरयाणवी गाण्याला १० लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे खलिफा आणि नितीका मल्होत्रावर शूट करण्यात आलं आहे. अमीन बरोडी याने हे गाणं लिहलं आहे. गाण्यात खलीफा आणि नितीकाची एक वेगळी केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. कमेंटमध्ये चाहते गाण्याचे खूप कौतुक करीत आहेत. रुचिकाच्या या व्हिडिओ गाण्यात नितीकाच्या भूमिकाही खूप आकर्षक आहेत.