'जुबान' या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ 

कला संगीत
Updated Mar 09, 2020 | 22:11 IST

Pavvy Latest Punjabi Song:पंजाबी सिंगर पैवीचं नव गाणं 'जुबान' रिलीज झालं आहे. लोकांना त्याचं हे नवं गाणं बरंच आवडत आहे.

मुंबई:  पंजाबी गाण्यांनी आपली ओळख निर्माण करणार्‍या गायक पैवीने एक नवीन गाणे रिलीज केले आहे. पैवीने यापूर्वीही ढुंढले जेहे, मेहबूब, यार पुलसिये और पैरेंट अशी अनेक गाणी गायली आहेत. नुकतेच त्याने 'जुबान' हे नवीन पंजाबी गाणे आणले आहे. या व्हिडिओमध्ये दोन मित्र कार अपघातातील जखमी मुलाला घेऊन इस्पितळात नेतात आणि  त्याच्या कुटुंबीयांना माहिती देतात. 

या गाण्याच्या माध्यमातून एक खास संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 'जुबान' हे गाणे स्वत: पंजाबी गायक पैवी याने गायले आहे आणि तर हे गाण जांग ढिल्लो याने लिहलं आहे. तर संगीत स्वतः पैवी यानेच दिलं आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी