मुंबई: Punjabi Song Temporary Pyar Viral: सुप्रसिद्ध पंजाबी गायक काकाचे नवीन गाणे 'Temporary Pyar' सध्या बरीच चर्चेत आहे. यूट्यूबवरील हे पंजाबी गाणे यूट्यूबवर सतत ट्रेंड होत आहे. हे गाणं खान बैनी यांनी लिहिले आहेत. हे गाणे अंजली अरोरा आणि अंगदवर चित्रित करण्यात आलं आहे. दोघेही या गाण्यात बरेच खूप छान दिसत आहेत. या गाण्याच्या व्हिडिओला आतापर्यंत 84 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पंजाबी गाण्यांमध्ये हे गाणं सध्या खूपच ट्रेंड करत आहे. हे गाणे नुकतेच नवीन वर्षच्या पार्टीत देखील गाजलं आहे.