मुंबई: Sapna Choudhary New song: प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. बऱ्याच दिवसानंतर सपना चौधरी हिचं नवीन गाणं यूट्यूबवर रिलीज झाले आहे. ऑक्टोबरमध्ये सपना चौधरी हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याआधी गर्भधारणेमुळे तिची नवीन गाणी प्रसिद्ध झाली नाहीत. चाहते बऱ्याच दिवसांपासून तिच्या नवीन गाण्याची प्रतीक्षा करत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे.
सपना चौधरी हिचा गाण्याचा व्हिडिओ आता रिलीज झाला असून तो हिट देखील ठरला आहे. या गाण्यात सपना चौधरी खूपच स्टाइलिश दिसत असून इंग्रजी बोलत आहे. हे गाणे गायक मोहित शर्मा यांनी गायले आहे, तर गीत सुमित बालंबिया लिहलं आहे.