Sapna Choudhary and Khesari Lal Yadav new song Matak Matak: हरियाणवी क्वीन सपना चौधरी आणि भोजपुरी सिनेमाचा सुपरस्टार खेसारी लाल यादव यांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. हरियाणवी सिनेमातील सपना चौधरी आणि भोजपुरी सिनेमातील खेसारी लाल यादव यांना अजिबात तोड नाही. (sapna choudharys new song has created a sensation)
या दोन्ही स्टार्सच्या गाण्यांना यूट्यूबवर चांगलीच पसंती मिळत आहे. आता या दोघांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की हे दोन्ही स्टार एकाच गाण्यात दिसले आहेत. दोघांचे नवे हरियाणवी गाणे मटक-मटक यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.
या गाण्याला आतापर्यंत 66 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्यातील खेसारी आणि सपना चौधरी यांचा जबरदस्त रोमँटिक डान्स पाहून चाहते रोमांचित झाले आहेत. हे गाणे विश्वजीत चौधरी यांनी गायले आहे तर त्याचे बोल अमीन बरोदी यांचे आहेत. हे गाणे असा डान्स नंबर आहे की जे पार्टीत नक्कीच थिरकायला लावतील.