[VIDEO] 'शूट दा ऑर्डर' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

कला संगीत
Updated Jan 25, 2020 | 22:57 IST

Latest Punjabi Song 2020: शूट दा ऑर्डर या नव्या पंजाबी गाण्याने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या गाण्याला आतापर्यंत तब्बल ६१ लाख व्ह्यू मिळाले आहेत. 

मुंबई: पंजाबी गायक जगपाल संधू याचं गाणं 'शूट दा ऑर्डर' हे २०१९ मध्येच रिलीज झालं आहे. पण आता हे गाणं एका नव्या अवतारात येत आहे. हे गाणं आगामी पंजाबी सिनेमा 'शूटर'सीठ रीक्रिएट केलं आहे. हे नवं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. आतपर्यंत या गाण्याला तब्बल ६१ लाख हिट्स मिळाले आहेत. 

या गाण्यात जगपालसोबत 'लंहगा' फेम जस मानकची देखील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. हे गाणं गीतकार रोशन याने लिहलं आहे. तर या गाण्याला संगीत दीप जांदू याने दिलं आहे. 'शूटर' हा पंजाबी सिनेमा २१ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी