मुंबई: प्रख्यात गायक सुखबीर सिंह यांचे बऱ्याच दिवसानंतर नवीन गाणं नचदी हे रिलीज झाले आहे. या गाण्यात सुखबीर खूप दमदार दिसत आहे ज्याची साथ अर्जुनने दिली आहे. अर्जुन खूप प्रसिद्ध रॅपर आहे. हे दोन सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या जोडीने नवं गाणं रिलीज केलं आहे. दरम्यान, सुखबीर सिंह यांनी नचदी गाण्यात भांगडा देखील केला आहे
सुखबीर सिंहने हे गाणं पहिलं अल्बम म्हणून रिलीज केले होते. पण लॉकडाउनच्या वेळी त्यांनी विचार केला की, हे गाणे नव्या रूपात परत रिलीज केलं पाहिजे. म्हणून 2021 च्या सुरुवातीस त्यांनी हे गाणं लाँच केलं आहे. दरम्यान, सुखबीर सिंह यांचे हे गाणे सोशल मीडियावर खूपच लाइक्स मिळत आहेत. तर यूट्यूबवर या गाण्याला ४.९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.