VIDEO: 'गर्लफ्रेंड' गाणं सोशल मीडियावर होतंय व्हायरल

कला संगीत
Updated Jan 06, 2021 | 17:37 IST

New Haryanvi Song: नवीन वर्षाच्या निमित्ताने रिलीज झालेल्या अजय हुड्डा आणि अंजली राघव यांचे गाणे 'गर्लफ्रेंड; इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबई: New Song: वर्ष 2020 मध्ये आपल्या एकापेक्षा एक अशा सरस गाण्यांनी हरियाणवी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये धमाल उडवून देणारा अजय हुड्डा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजय हुड्डाची गाणी इंटरनेटवर रिलीज होताच काही तासात सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

नवीन वर्षाच्या निमित्ताने अजय हुड्डाचे गाणे 'गर्लफ्रेंड' हे इंटरनेटवर रिलीज झाले आहे. या गाण्यात अंजली राघव अजय हुड्डाबरोबर दिसली आहे. या गाण्याला अवघ्या काही दिवसांत ३ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

यापूर्वीही अजय हुड्डा 2020 मध्ये देखील एका  गाण्यात अंजली राघवसोबत दिसला होता. हे गाणे स्वतः अजय हुड्डा याने लिहिले आहे. तर या गाण्याला अरविंद जांगिड यांनी आपला आवाज दिला आहे. तसेच याला संगीत देखील त्यानेच दिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी